आदिवासी घोटाळ्यातील कर्मचाऱ्यावरील कारवाईसाठी 27 ला राज्यभर आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

नाशिकः आदिवासी  विकास मधील 104 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील साडे सहाशे कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करा. या मागणीसाठी येत्या 27एप्रिलला राज्यभर आंदोलन केले जाईल. त्यानंतरही ठोस कारवाई न झाल्यास आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांच्यासह आयुक्तांनाही गाव बंदी केली जाईल. असा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे अध्यक्ष महेश भारतीय यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला. 
 
श्री.भारतीय म्हणाले की,न्यायाधीश एम.जी. गायकवाड समीतीने चार वर्ष चौकशी करुन साडे सहाशे कर्मचारी, ठेकेदार यांच्यावर 104कोटीरुपायंच्या गैरव्यवहाराचा ठपका ठेवला आहे. आदीवासींच्या घशातील घास काढणाऱ्या या कर्मचाऱ्यांना आता कोणतीही दयामाया न दाखवीता ठोस कारवाई करण्याची गरज आहे,आता शिफारशी प्रमाणे ठोस कारवाई करंदीकर समीतीने करणे गरजेचे आहे.जे जे भ्रष्टाचारी असतील त्यांना त्वरीत निलंबीत करुन घोटाळ्याची रक्‍कम वसुल करावी. अशी अपेक्षा आहे. त्यासाठी 27 एप्रीलला आदीवासी विकास आयुक्त ालयावर मोर्चा काढुन निर्वाणीचा इशारा दिला जाईल.तसेच प्रत्येक जिल्ह्यात आंदोलने होतील. त्यानंतर मात्र आदीवासी विकास मंत्र्यांसह संबंधीत अधीकाऱ्यांना गाव बंदी आंदोलनाची सुरवात होईल. पावसाळी अधीवेशनातही या प्रश्‍नी मोर्चा काढला जाईल.
 
श्री. भारतीय पुढे म्हणाले सध्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना भोजन देण्याएैवजी खात्यावर पैसे जमा करण्याचा निर्णय होत आहे. मात्र त्याला आमचा विरोध आहे.त्यंना भोजनच नियमीत दर्जेदार मिळाले पाहीजे. त्यानंतर विद्यार्थ्यांची वर्षातुन दोनदा आरोग्य तपासणी करा.आरोग्य पत्रीका द्या, विद्यार्थ्यांना ब्रॅडेन्ड वस्तुंचाच पुरवठा करा, शैक्षणीक व क्रीडा साहीत्य मुळ कंपन्यांचे द्या. असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी वामनराव गायकवाड,नितीन भुजबळ,मिलींद सावंत, तराचंद मोतवाल,मारुती घोडेराव, विजय कटारे, जितेंद्र शार्दुल आदींसह भारिप बहजुन महसंघाचे पदाधीकारी उपस्थीत होते. 
 
Web Title: MARATHI NEWS ADHIVASI FRAUD WORKER