आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याचे मृत्यू टाळण्यासाठी 24 तास रूग्णवाहिका

विजय पगारे
मंगळवार, 31 जुलै 2018

इगतपुरी : राज्यातील आदिवासी भागातील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचे  तात्काळ उपचाराअभावी मृत्यू होतात. ते  टाळण्यासाठी आता आदिवासी विकास विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील 301 शासकीय आश्रमशाळा व 8 एकलव्य निवासी आश्रमशाळेतील एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 24 बाय 7 तास आरोग्यसेवा व रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.
   
    केंद्र शासनाच्या विशेष केंद्रीय सहाय्यअंतर्गत मंजूर अनुदानातून व राज्य योजना निधीतून आदिवासी विकास विभागाच्या  शासकीय आश्रमशाळा,एकलव्य निवासी आश्रमशाळा व इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. त्यानुसार अतिसुसज्ज रुग्णवाहिकांची आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसाद सेवा पुरवणाऱ्या भारत विकास ग्रुप ऑफ इंडियातर्फे ही सुविधा दिली जाईल. सुविधा पुरवण्यासाठी 53 कोटी 47 लाख रुपयांच्या या नवीन प्रकल्पास मान्यता दिली आहे.या नवीन निर्णयामुळे केवळ रुग्णवाहिका व डॉक्टरांची सेवा तात्काळ न मिळाल्याने आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या मृत्यूच्या घटना टाळता येतील.

देशातील आदिवासी लोकसंख्येत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. राज्याच्या एकूण लोकसंख्येत अनुसूचित जातीचे प्रमाण 9.4 टक्के इतके आहे..या भागातील जनतेच्या विकासासाठी राज्यात 301 शासकीय निवासी आश्रमशाळा व 8 एकलव्य निवासी आश्रमशाळा कार्यरत असून यात 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
 
Web Title: marathi news ashramshala student death

टॅग्स