बॅंकेच्या चुकीने व्यावसायिकाला भामट्याने घातला गंडा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

नाशिक : राष्ट्रीयकृत बॅंकेने आरबीआय बॅंकेच्या निर्देश पायदळी तुडवून भामट्याने केलेल्या फोनवरून एका व्यावसायिकाच्या बॅंक खात्याच्या गोपनीय माहितीमध्ये बदल केला. परिणामी, भामट्याने व्यावसायिकाच्या खात्यातून तब्बल साडेपाच लाख रुपये काढून घेत गंडा घातला. याप्रकरणी संबंधित व्यावसायिकाने जाब विचारला असता बॅंकेने टाळण्याचा प्रयत्न केला आहे तसेच, पोलीस चौकशीतून बचाव करण्यासाठी बॅंकेने फिर्याद देण्यासही टाळाटाळ सुरू केली आहे. त्यामुळे व्यावसायिकाने आता बॅंकेच्या व्यवस्थापकाविरोधातच फसवणुकीची फिर्याद पोलिसात देण्याची भूमिका घेतली आहे.

     शहरातील हॉटेल व्यवसायामध्ये मोठे नाव असलेल्या व्यवसायिकाला अज्ञात संशयिताने मेल पाठविला होता. त्या मेलची लिंक व्यवसायिकाने ओपन केल्याने त्यांच्या मेलची माहिती अज्ञात संशयिताने चोरली. यात संशयिताकडे व्यवसायिकाचा बॅंकेकडे असलेल्या मोबाईल क्रमांकाची माहिती गेली. या माहितीच्या आधारे अज्ञात संशयिताने एका राष्ट्रीयकृत बॅंकेकडे फोन करून बॅंक खात्यावर नोंदण्यात आलेला मोबाईल क्रमांक बदल्याची विनंती केली. संबंधित कर्मचाऱ्यांनेही कोणतीही शहानिशा न करता  भामटयाने केलेल्या फोनवर विश्‍वास ठेवून व्यवसायिकाच्या बॅंक खात्यावर असलेल्या मोबाईल क्रमांक बदलून भामट्याने सांगितलेला मोबाईल क्रमांक जोडला.

दरम्यान, ही  प्रक्रिया पूर्ण होताच, अज्ञात संशयिताने व्यावसायिकाच्या बॅंक खात्यातून तब्बल साडेपाच लाख रुपये ऑनलाईन बॅंकिंगच्या आधारे काढून घेतले.ही बाब दोन दिवसांनी व्यावसायिकाला बॅंकेत गेल्यानंतर लक्षात आली. साडेपाच लाखांची रक्कम काढलेली नसताना आणि पैसे काढल्याचा कोणताही मोबाईल संदेश आलेला नसताना पैसे काढले कसे, याचा जाब व्यावसायिकाने बॅंकेच्या व्यवस्थापकाला विचारला. त्यावर चौकशी केल्यानंतर मोबाईल क्रमांक बदलण्यात आला आणि त्यानंतर पैसे ऑनलाईन काढण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, सावधान असे आपल्याही बाबतीत घडू शकते. 

आरबीआयच्या नियमांचीच पायमल्ली 
आयबीआरच्या (रिझर्व बॅंक) नियमानुसार, आपल्या बॅंक खात्याशी निगडित असलेल्या गोपनीय माहितीमध्ये कोणताही बदल करावयाचा असेल तर त्यासाठी संबंधित खातेदाराने स्वत: बॅंकेत समक्ष जाऊन आणि स्वाक्षरी करूनच बदल करायचे असतात. त्यासाठी बॅंकेच्या कर्मचाऱ्यास फोन करून बदल करणे अपेक्षित नाही. मात्र याप्रकरणी बॅंकेच्या कर्मचाऱ्याने संशयिताच्या फोनवर विश्‍वास ठेवून बदल केल्याने हे प्रकरण बॅंकेच्या अंगलट आले आहे. यात बॅंकेच्या व्यवस्थापकावर गंभीर गुन्हा दाखल होऊन  रकमेची भरपाईही करावी लागू शकते. त्यामुळे बॅंकेचा व्यवस्थापक पोलिसात फिर्याद देण्यास टाळाटाळ करीत आहे.

Web Title: marathi news bank procedure