साडे चारशे बॅकांतील साडे 3 हजारावर कर्मचारी संपात 

live photo
live photo

नाशिक : राष्ट्रीयीकृत बॅक आधिकाऱ्यांच्या युनायटेड फोरम ऑफ बॅक युनियनने पुकारलेल्या आजच्या संपात जिल्ह्यातील 450 शाखातील साडे तीन हजाराहून बॅक 
कर्मचारी सहभागी झाले. त्यामुळे शहर-जिल्ह्यातील बॅकीग कामकाजावर परिणाम झाला आहे. आजपासूनच नागरिकांना संपाची थेट तीव्रता जाणवू लागली आहे. 

    देशात ऑनलाईन बॅकींगसोबत विविध सरकारी योजनांचे कामकाज बॅकांवर लादण्यात आले. जनधन योजनांपासून विविध योजनांचे अनुदान वाटपा इतरही अनेक कामे लादल्यानंतरही बॅक कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा विषयात मात्र भ्रमनिरास केला अशी देशातील बॅक कर्मचाऱ्यांची भावना आहे. त्याविरोधात आज पहाटेपासून देशातील 6 लाख तर जिल्ह्यातील 3500 हजारावर कर्मचारी संपात उतरले आहेत. त्यामुळे आर्थिक कामकाजावर त्याचा परिणाम झाला आहे.

एकाबाजूला शासकीय कर्मचाऱ्यांना 28 टक्के 
वेतनवाढ देत असतांना बॅकींग कर्मचाऱ्यांना मात्र 2 टक्के वाढ म्हणजे चेष्टा आहे. असा कर्मचाऱ्यांचा आरोप असून 1 सप्टेंबर 2017 पासून भरीव स्वरुपाची वेतनवाढ 
द्यावी यासाठी संप पुकारला आहे. 

द्वारसभा 
संपाच्या पार्श्‍वभूमीवर आज नाशिकला सीबीएस येथे स्टेट बॅकेच्या मध्यवर्ती शाखेसमोर जिल्ह्यातील विविध बॅकांच्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या नेतृत्वाखाली द्वारसभा घेत बुधवारी सकाळी निषेध केला. जोरदार घोषणाबाजी केली. संपामुळे बॅकांतील कामकाज पूर्णपणे थंडावले आहे. एटीएम केंद्र आणि ऑनलाईन बॅकींग कामकाज मात्र सुरु होते. 
पण संपाच्या धास्तीने एटीएम केंद्रातून रोकड काढण्यासाठी गर्दी होउ लागताच. दुपारपासूनच एटीएममध्ये खडखडाट सुरु झाला. 

नउशे एटीएमवर भिस्त 
शहर जिल्ह्यात सुमारे 903 एटीएम आहेत. दिवसाला 95 कोटीची रोकड लागते. रोज एटीएम भरावे लागतात. दोन दिवसांच्या सुट्यांमुळे बुधवारी सायंकाळनंतर एटीएमवर 
परिणाम होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

पारंपारीक बॅकींग कामाशिवाय जनधन पासून तर सरकारी योजनांचे आधार लिंक अनुदान वाटपापर्यतचे सगळ्या कामाचा भार बॅकांवर लादल्यानंतर केवळ 2 टक्के वेतनवाढ म्हणजे बॅक कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे. 
-उदय महादास, झोनल सेक्रेटरी, बॅक आधिकारी संघटना 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com