देशभरातील मेल, एक्‍स्प्रेसमध्ये "ट्रेन कॅप्टन'ची निगराणी

देशभरातील मेल, एक्‍स्प्रेसमध्ये "ट्रेन कॅप्टन'ची निगराणी

भुसावळ : धावत्या रेल्वेत प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या जागेवरच निकाली काढण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार "ट्रेन कॅप्टन'चे नवीन पद निर्माण करून त्याची नियुक्ती केली आहे. मेल आणि एक्‍स्प्रेस गाड्यांमधील प्रवाशांच्या सुविधांसाठी ट्रेन कॅप्टनचा रोल महत्त्वपूर्ण असून भुसावळ विभागातून धावणाऱ्या शंभरपेक्षा अधिक गाड्यांमध्ये याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पॅसेंजर (सामान्य) रेल्वेसाठी मात्र ही सुविधा नाही. 

प्रवाशांना धावत्या रेल्वेत बऱ्याचदा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सुरक्षितता, डब्यांमधील बंद पंखा, पाणी नसणे, लाइट न लागणे, शौचालयातून दुर्गंधी येणे, आरक्षित डब्यांमधून अनारक्षित तिकिटांवर प्रवास, वातानुकूलित यंत्रणेत बिघाड, अनधिकृत वेंडर्सकडून चढ्या भावाने खाद्यपदार्थांची विक्री, चोरी, छेडछाड, महिला डब्यातून पुरुष प्रवाशांनी प्रवास करणे अथवा अस्वच्छता अशा एक ना अनेक तक्रारी उद्‌भवतात. डब्यातील तिकीट तपासणीसाकडून (टी. सी.) याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. अशा सर्व प्रकारांची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने त्यावर उपाययोजना म्हणून रनिंग ट्रेनसाठी "ट्रेन कॅप्टन'ची नियुक्ती केली. ट्रेन कॅप्टन प्रवाशांच्या तक्रारींचे तातडीने रेल्वे सुरक्षा बल, विद्युत विभाग, यांत्रिकी विभाग, खानपानसह सर्व विभाग कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून प्रवाशांच्या अडचणी सोडवत आरामदायी आणि सुखकर प्रवासाची रेल्वेची उद्‌घोषणा प्रत्यक्षात येईल. 
भारतीय रेल्वेच्या सर्व झोनमध्ये तिकीट तपासणीस कर्मचाऱ्यांमधील वरिष्ठ आणि अनुभवी कर्मचाऱ्याची ट्रेन कॅप्टन म्हणून नियुक्ती झाली आहे. भुसावळ विभागात तिकीट तपासणीस (टी. सी.) सारखा गणवेश घातलेल्या या कॅप्टनच्या दंडावर "सेंट्रल रेल्वे भुसावळ ट्रेन कॅप्टन' "आर्म बॅंड' (बॅज) बांधलेला असेल. देशभरातील रेल्वेच्या विविध झोनमध्ये त्या विभागाचे नाव कॅप्टनच्या बॅजवर असेल आणि ठराविक अंतर पार केल्यानंतर बदली कॅप्टन जागा सांभाळणार आहे. 
 
भुसावळ विभागात ट्रेन कॅप्टनचे काम दोन दिवसांपासून सुरू झाले आहे. त्यामुळे मेल आणि एक्‍स्प्रेसमधील तक्रारी लगेच दूर करता येतील. प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी प्रयत्न आहे. 
- सुनील मिश्रा, वरिष्ठ वाणिज्य विभागीय व्यवस्थापक मध्ये रेल्वे, भुसावळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com