एसटी बस चालकास शिविगाळ, मारहाण 

Marathi news chalisgaon ST bus driver
Marathi news chalisgaon ST bus driver

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : चाळीसगावहून दरेगाव येथे जाणाऱ्या बसचालकास एकाने मारहाण करून शिवीगाळ केल्याची घटना आज सकाळी सातच्या सुमारास खडकी फाट्यावर घडली. याबाबत शासकीय कामात व्यत्यय आणल्याप्रकरणी शिवीगाळ करणाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव आगारातून दरेगावला ही बस (क्रमांक एमएच 14 बीटी 2422) जात होती. या बसचे चालक मोहन भगवान गढरी आज सकाळी बस घेऊन दरेगावहून खडकीसिंम फाट्यावर आले. तेथे उभ्या असलेल्या चेतन प्रभाकर पाटील या तरूणाने बसचालक मोहन गढरी यांना शिवीगाळ करून थोबाडीत मारली. शिवीगाळ केल्याचे कारण स्पष्टं झाले नाही. मेहुणबारे पोलिसांनी मोहन गढरी यांच्या तक्रारीवरून चेतन पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com