छगन भुजबळांची प्रकृती खालावली 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

नाशिक - दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी मार्च 2016 पासून तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती खालावली आहे. सध्या ते मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात असून, गेल्या आठ दिवसांमध्ये त्यांचे वजन दहा किलोने कमी झाले आहे. भुजबळ यांना प्रचंड अशक्तपणा आला आहे. खोकल्यामुळे रात्रभर त्यांना झोप येत नाही. ही सारी परिस्थिती काल (ता. 26) मुंबईत "ईडी'च्या न्यायालयात तारखेसाठी भुजबळ यांना आणले असताना पाहायला मिळाल्याचे भेटीवेळी उपस्थित असलेल्यांनी सांगितले. 

Web Title: marathi news Chhagan Bhujbal nashik news