सिव्हिलमधील नवजातांसाठी "सिरिंज पंप',बारामती ऍग्रो'तर्फे प्रदान 

residenational photo
residenational photo

नाशिक  : नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील कमी वजनाच्या नवजातांवर आधुनिक उपचारासाठीची "सिरिंज पंप' आज प्रदान करण्यात आले. बारामती ऍग्रो या कृषीक्षेत्रातील प्रतितयश कंपनीकडून 10 पंप पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहीत राजेंद्र पवार यांच्या हस्ते देण्यात आले. त्याचवेळी त्यांनी राजेंद्र पवार यांच्या एकषष्टीनिमित्ताने नवजात कक्षातील बालकांसाठी बारामती ऍग्रो महिला बचत गटाने तयार केलेल्या कपडयांचेही वाटप केले. राज्यातील जिल्हा रुग्णालयांमध्ये 6 हजार 100 नवजात बालकांच्या कपड्यांचे वाटप केले जात असल्याते श्री. पवार यांनी यावेळी सांगितले. 
... 
पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहीत पवार हे राष्ट्रवादीचे नेते व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे नातू व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे आहेत. राजेंद्र पवार यांच्या एकषष्टीनिमित्ताने राज्यभरातील जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांना त्यांच्या हस्ते कपडे वाटप केले जात आहेत. त्याच पार्श्‍वभूमीने आज ते नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात आले. बारामती ऍग्रो या कृषीक्षेत्रातील कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) 10 सिरिंज पंप प्रदान करण्यात आले. यावेळी रुग्णालयाचे बाह्यविभागाचे निवासी वैद्यकीय अधिकारी आनंद पवार, नवजात बालक अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. पंकज गाजरे यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पगार, माजी शहराध्यक्ष अर्जून टिळे, पुरुषोत्तम कडलग, जिल्हा परिषदे सदस्य हिरामण खोसकर, यतिन कदम, आकाश पगार, जयराम शिंदे, कैलास मोरे, गौरव ढोकणे, सोमनाथ खताळे आदींसह पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते. 
 
आधी इन्क्‍युबेटर्स अन्‌ आता सिरिंज पंप 
बारामती ऍग्रोतर्फे यापूर्वी नाशिक जिल्हा रुग्णालयास सामाजिक उत्तरदायित्वातून (सीएसआर) 9 इन्क्‍युबेटर्स देण्यात आले आहेत. तर आता 10 सिरिंज पंप. कमी वजनाचे वा इन्क्‍युबेटर्समध्ये दाखल नवजात बालकांना 12 तासांमध्ये 50एमएल औषध द्यावे लागते. पारंपरिक सिरिंजद्वारे ते देणे काहीसे धोकादायक असते. त्यासाठी सिरिंज पंप हे आधुनिक उपकरण वापरले जाते. रुग्णालयाकडे 10 पंप होते, त्यात 10 नवीन आल्याने आता 20 पंप झाले आहेत. त्यामुळे नवजात बालकांवर उपचार करणे उपयुक्त ठरणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com