"स्कील सिटी' च्या रूपाने नाशिकचे व्हावे "ब्रॅंडींग'-जितुभाई ठक्कर 

live photo
live photo


नाशिकचे "स्कील सिटी' म्हणून "ब्रॅंडींग' व्हायला हवे, अशी आग्रही भूमिका ठक्कर डेव्हलपर्सचे प्रमुख जितूभाई ठक्कर यांनी आज मांडली. पायाभूत सुविधांचा झालेला विकास ही आपली जमेची बाजू असून प्रत्येकाने स्वतःची प्रगती साधण्यासाठी "मेन्टॉर' निवडायला हवेत. एकदा कौशल्य अवगत झाल्यात म्हटल्यावर अशांनी आपल्या सोबत आणखी एकाच्या कौशल्य विकासाकडे ध्यान दिल्यानंतर नाशिकमध्ये मोठा बदल पाह्यला मिळेल, असा आशावाद त्यांनी मांडला. निमित्त होते, "कॉफी विथ सकाळ' उपक्रमात "सकाळ'च्या संपादकीय सहकाऱ्यांशी झालेल्या संवादाचे... 

"रिअल इस्टेट' क्षेत्रात 1962 पासून वडील कार्यरत होते. आपल्या मुलांनी या क्षेत्रात येऊ नये अशी त्यांची इच्छा होती. वडील "प्लॉटिंग' करायचे. पन्नास रुपये महिना अशी योजना चालवायचे. भांडवल कमी होते. व्यवसाय अडचणीत आल्यावर वडिलांनी घरातील दागिने विकले. पुढे 1978-79 मध्ये कायदेशीर अडचणीतून "प्लॉट' मोकळे झाल्यावर सात ते आठपटीने भाव वाढले होते. तेंव्हा लोकांच्या चेहऱ्यावर समाधान पाह्यला मिळाले होते. खरे इथून आमच्या व्यवसायाने "टेक-ऑफ' घेतला. विस्तारत असलेल्या सातपूरमध्ये उद्योग उभारण्यासाठी घेण्यात आलेला भूखंड विकत मी सुद्धा वडिलांच्या व्यवसायात सहभागी झालो, असे सांगितले.

 जितूभाई म्हणाले, की बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियामध्ये "रिअल इस्टेट' हा स्वतंत्र विभाग करुन आम्ही त्याच्या माध्यमातून व्यवसायाच्या अडचणी सरकारकडे मांडण्यास सुरवात केली. मग आम्ही प्रमोटर्स अँड बिल्डर्स नाशिकची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून राज्यभर संघटनात्मक विस्तार केला. 1989 मध्ये राष्ट्रीय गृह धोरणाची तयारी सुरु असतांना राष्ट्रीय क्रेडाईचा जन्म नाशिकमध्ये झाला.

2009 मध्ये तत्कालिन अर्थमंत्री पी. चिदंबरम्‌ यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी कौशल्य विकासचा मुद्दा पुढे आला आणि सरकार, क्रेडाई, फिक्की आणि इतर संघटनांच्या पुढाकारातून राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाची स्थापना झाली. बांधकाम कौशल्य विकास परिषदेची स्थापना करण्यात आली. महामंडळ आणि परिषदेच्या माध्यमातून कौशल्यविषयक प्रशिक्षणावर भर देण्यात येत आहे.

प्रत्येकाने कौशल्याचा अंगीकार करावा म्हणून पाचवीपासून कौशल्य विषयकाचे विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. 
 
छोट्या आकाराची घरे हे नवे "प्रॉडक्‍ट' 
मंदीमुळे जमिनीच्या किंमती कमी होत नाहीत. तीन वर्षांपासून असलेले बाजारभाव आता आणखी कमी होतील याची शक्‍यता नाही. त्यामुळे पाचशे चौरस फूट अशा छोट्या आकाराच्या घरांचे नवे "प्रॉडक्‍ट' बाजारात येतील. हा बदल जितूभाई यांनी पंतप्रधान आवास योजनेचा संदर्भ देत सांगितला.

"सर्वांसाठी घरे' योजनेतंर्गत कष्टकऱ्यांनी आपल्या डोळ्यादेखत सदनिका घेतल्या आहेत. माणसाला स्वतःचे घर झाल्यावर आयुष्यात स्थिरतेची सुरवात होते, असे सांगून ते म्हणाले, की पंतप्रधान आवास योजना आणि मजूर म्हणून नोंदणी असल्यास राज्य सरकार असे एकुण 4 लाख 68 हजार रुपयांचे अनुदान मिळते. मुद्रांक शुल्क, जीएसटी, प्राप्तिकर, चटई क्षेत्र अशा सवलतीमुळे नवे "प्रॉडक्‍ट' जोरात चालेल. 

"रेरा'मधून प्रत्येकाला सुरक्षितता 
नाशिक शहराचा चेहरा बदलला आहे. आता सार्वत्रिक जागा, सार्वत्रिक सुविधा अशांबद्दल अधिकचा आग्रह बांधकाम क्षेत्रात दिसतोय. याशिवाय घर विकत घेण्यासाठी व्यावसायिक आणि ग्राहक भेटीगाठी हा "ट्रेंड' आहे. मात्र "रेरा' आल्याने प्रत्येक जण सुरक्षित झाला आहे. "रेरा'मुळे व्यक्तीगत भेटीगाठीविना व्यवहार होण्यास चालना मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले. "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने यांनी उपक्रमामागील भूमिका मांडली. 

जितूभाई म्हणतात.... 
- नाशिक महापालिकेतर्फे करातील गळती रोखण्यासाठी कर वसुलीचे "आऊट सोर्सिंग' करायला हवे 
- आर्थिक अडचणींमुळे आरक्षित भूखंडाचे संपादन होत नसल्याने आरक्षण उठते ही बाब चिंताजनक 
- महापालिका हद्दीत पिवळा, हिरवा पट्टा असण्याचे कारण नाही. शेती होत नसल्यास मोकळ्या जागेवर कर आकारला हरकत असण्याचे कारण नाही 
- हिरव्या पट्यात शिक्षणाची व्यवस्था होऊ शकते या धोरणामुळे जागेअभावी परताव्या लागलेल्या संस्था नाशिकमध्ये येत आहे.

- कार विकत घेताना पार्किंगच्या जागेचा कायदेशीर विचार झाल्यास पार्किंगचा प्रश्‍न निकाली निघण्यास मदत होईल 
- पार्किंगच्या अनुषंगाने नागपूरमध्ये करण्यात आलेले बदल नाशिकमध्ये लागू व्हायला हवेत 
.... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com