आयुक्तांविरोधात अधिकारी बंडाच्या पावित्र्यात,सामुहिक राजीनाम्याची तयारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

नाशिकः महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कामकाजाच्या पध्दतीमुळे त्रासलेल्या अधिकारी वर्गाकडून बंडाचे हत्यार उपसले जाण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली असून बंडाच्या पहिल्या टप्प्यातचं सामुहिक राजीनामे देण्याची तयारी केल्याचे वृत्त आहे. 

   महापालिका आयुक्त मुंढे यांनी फेब्रुवारी महिन्यात पदभार घेतल्यापासून पालिकेच्या कामकाजाला शिस्त लावण्यासाठी कसोसीने प्रयत्न सुरु केले आहेत. त्यांच्या भुमिकेला अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून देखील तितकाच प्रतिसाद मिळतं असला त्यांची काम करून घेण्याची पध्दत व वांरवार निलंबनाची धमकी देण्याच्या प्रकारामुळे अधिकारी वर्गात मोठा असंतोष निर्माण झाला आहे.

   नियमित कामे सोडून तक्रारी सोडविण्यात वेळ जातो. शिवाय नियमित कामांची देखील विचारणा होत असल्याने कामे अपुरी राहतात. त्यातून कारणे दाखवा नोटीस, निलंबन आदी कारवाईला सामोरे जावे लागतं आहे. पालिकेत मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असल्याने एका कर्मचाऱ्याला अनेक प्रकारची कामे करावी लागतात. अधिकाऱ्यांकडे देखील अनेक पदांचा कार्यभार असल्याने कामाचा मोठा ताण निर्माण झाला आहे. अधिकायांची बाजू ऐकून घेण्यासाठी यंत्रणा उपलब्ध नाही.

अधिकाऱ्यांना फक्त ऐकावे लागतं असल्याने मोठी कोंडी झाली आहे. त्यातून अधिकाऱ्यांनी एका गुप्त ठिकाणी मिटींग घेवून सामुहिक राजीनाम्याच्या माध्यमातून आयुक्तांविरोधात दंड थोपटण्याची तयारी सुरु केल्याचे समजते. यापुर्वी अभिषेक कृष्णा आयुक्त असताना त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वागणूक देण्याच्या पध्दतीमुळे अधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा पवित्रा घेतला होता. पण तत्कालिन आयुक्त कृष्णा यांनी नरमाईची भुमिका घेतल्यानंतर आयुक्त विरुध्द अधिकारी संघर्ष संपुष्टात आला होता. पालिकेच्या इतिहासात आयुक्तांविरोधात थेट भुमिका घेण्याची ती पहिलीचं वेळ होती. आता मुंढे यांच्या विरोधात अधिकारी सरसावले असून त्यात अभियंत्यांचा सर्वाधिक समावेश असल्याचे समजते. 

Web Title: marathi news commisioner