"सीएस'च्या फाउंडेशन प्रोग्रॅममध्ये  नाशिकचे 51 विद्यार्थी उत्तीर्ण 

residenational photo
residenational photo

नाशिक : दी इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज्‌ ऑफ इंडिया (आयसीएसआय)तर्फे डिसेंबर 2017 मध्ये घेण्यात आलेल्या फाउंडेशन प्रोग्रॅम या सीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेचा निकाल बुधवारी (ता. 21) जाहीर झाला. या परीक्षेत नाशिकचे 51 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता यादीत प्रज्योत ठाकूरने राष्ट्रीय स्तरावर चौदावा, तर मयूरी जाधवने 23 वा क्रमांक मिळवला. 

नाशिकमधून अव्वल क्रमांकासह उत्तीर्ण होणाऱ्या प्रज्योत ठाकूरने 344, तर मयूरी जाधवने 326 गुण मिळविले. संजना कुमावत (320), आयुष वाढी (314), प्राची पंजाबी (314), प्रसन्न जोशी (312), रोहित रसाळकर (294), श्रेयोसी दास (292), मितेश बुरड (284), सैनी अमनप्रित कौर (284) हे विद्यार्थी नाशिकमधील अव्वल दहांमध्ये आले, तर नाशिक चॅप्टर क्‍लासमधून मयूरी, प्रसन्न, मितेशसह सुखदा लोहारकर, केतकी कुलकर्णी, नीता दराडे, शारदा जोशी, आदिती गायधनी, प्रियंका जोशी, तेजल गुजर, गणेश सोनवणे, जागृती पगार, पल्लवी वाजे या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. नाशिक शाखेचे अध्यक्ष सीएस अमित कोचर, सीएस मिलिंद गुजर यांच्यासह कार्यकारिणीने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 

असा असेल पुढील अभ्यासक्रम 
सीएसचा अभ्यासक्रम तीन टप्प्यांत पूर्ण करायचा असतो. यात पहिला टप्पा फाउंडेशन प्रोग्रॅम अर्थात, प्रवेश परीक्षेचा असतो. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी हा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. आता दुसऱ्या टप्यात विद्यार्थ्यांना एक्‍झिक्‍युटिव्ह परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेत सात विषयांचा समावेश असतो. तर ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अंतिम टप्प्यात प्रोफेशनल ही परीक्षा उत्तीर्ण होतांना "सीएस'पर्यंतचा विद्यार्थ्यांचा प्रवास पूर्ण होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com