निफाडच्या युवकाचा गंगापूर धरणात बुडून मृत्यु 

residenational photo
residenational photo

नाशिक : गंगापूर धरणातील जॅकवेलजवळ 33 वर्षीय युवकाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. पोलीसात तपासामध्ये सदरचा मृतदेह सागर बाळासाहेब सोनवणे (33, रा. घर नं.9, शिंपीलेन, निफाड, जि. नाशिक) याचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. 
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी 9 च्या सुमारास गंगापूर धरणातील जॅकवेलजवळ सागर सोनवणे याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. नाशिक तालुका पोलिसांना घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात मृतदेह पाठविण्यात आला. दरम्यान दुपारी मृतदेहाची ओळख पटली. मात्र अजूनही युवकाने आत्महत्त्या केली की घातपात झाला याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीसा अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com