डिजिटल शिक्षणाद्वारे विद्यार्थी गिरवताहेत धडे 

live photo
live photo

लिड... 
महापालिकेच्या शाळा... तेथील अस्वच्छता, विद्यार्थी, शैक्षणिक सुविधांचा अभाव यांसारख्या कारणांमुळेच कायमच टीकेच्या धनी बनलेल्या आहेत. या शाळा सुधारण्याच्या दृष्टीने प्रशासनही वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करताना दिसते, पण त्यांना यश काही येत नाही. काही शाळांनी अडचणींवर मात केली. नामांकित खासगी शाळेतील शिक्षणाप्रमाणेच विद्यार्थ्यांना डिजिटल उपकरणांद्वारे शिक्षणाबद्दलची गोडी लावली. वेगवेगळे वैज्ञानिक प्रयोग, व्यावहारिक आणि औद्योगिक शिक्षणाची ओळख करून दिली. असाच नावीन्यपूर्ण प्रयोग राबविणाऱ्या व इतरांसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या महापालिकेच्या मॉडेल स्कूलविषयी आजपासून मालिका... 
-------------------- 

नाशिक : सातपूरचे विश्‍वासनगर कामगारवस्तीचा महत्त्वपूर्ण भाग म्हणून परिचित आहे. या भागातील 
(स्व.) मॉंसाहेब मीनाताई ठाकरे शाळा क्रमांक 22 मध्ये येणारे सर्व विद्यार्थी कामगारांचे, तिथल्या वस्तीतील. अशा वातावरणातही शिक्षकांनी नावीन्यपूर्ण प्रयोग आणि शिक्षणाची जोड देत विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच विद्यार्थी अद्ययावत डिजिटल शिक्षणाचे यशस्वीपणे धडे गिरवत आहेत. आज शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील विद्यार्थी राज्यात आपले आणि शाळेचे नाव उंचावत आहेत. 

दहा वर्षांत या शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख हा कायमच वर राहिला. प्रत्येक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात या शाळेचा हातखंडा आहे. पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग भरत असलेल्या या शाळेत 700 विद्यार्थी शिक्षण घेतात. इतर शाळांच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. पहिली ते आठवीपर्यंत मराठी आणि सेमी इंग्रजीच्या माध्यमाबरोबर ज्युनिअर केजीपासून ते चौथीपर्यंत स्वतंत्र इंग्रजी माध्यमाचे वर्गही आहेत. विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची ओळख व्हावी, यासाठी महापालिका आणि लोकसहभागातून शाळेत चार प्रोजेक्‍टर आणि दहा लॅपटॉपद्वारे विद्यार्थ्यांना हसतखेळत शिक्षण मिळत आहे. 

शिष्यवृती परीक्षेच्या तयारीकडे लक्ष 
शालेयस्तरावर विविध शिष्यवृत्त्यांच्या परीक्षेची तयारी शिक्षकांकडून करून घेतली जाते. त्यासाठी खास नियोजन केले जाते. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता लक्षात घेऊन संधी देत त्यांचा आत्मविश्‍वास वाढविला जातो. राज्यात दर वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील सात ते आठ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आपले नाव झळकवतात. विद्यार्थ्यांनी विद्यालयात प्रत्येक भिंतीवर ज्ञानात भर पडेल अशी माहिती काढली आहे. 

"एक धागा शौर्य का' उपक्रम 
डिजिटल शिक्षणाद्वारे शिक्षण देताना शाळेकडून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अहवाल ऍपद्वारे जाणून घेतला जातो. खासगी संस्थेने विकसित केलेले क्‍यू ईजिली हे ऍप शाळेमार्फत पालकांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून देण्यात आले असून, याचा वापर विद्यार्थी घरबसल्या अभ्यास करू शकतो. कंपनीतर्फे हा डाटा शाळेला मिळून यातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अहवाल शिक्षकांना मिळतो. शाळेतील विद्यार्थ्यांकडून "एक धागा शौर्य का, एक राखी अभियान की' उपक्रमांतर्गत सीमेवरील जवानांना नियमित राख्या पाठवितात. 

ठळक वैशिष्ट्ये 
* सीसीटीव्हीची विद्यार्थ्यांवर नजर 
* ऑनलाइन हजेरी 
* सतत 90 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती 
* शुद्ध पाणीपुरवठा 
* विद्यार्थ्यांचे 100 टक्के आधारकार्ड आणि बॅंक खाते; थेट लाभ 
* दहावीपर्यंत वर्ग चालणारी एकमेव शाळा 

शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी डिजिटल शिक्षणाद्वारे अध्ययन केले जाते. यामुळे आज सर्वाधिक विद्यार्थ्यांची संख्या या शाळेत आहे. योग्य नियोजन, मार्गदर्शन आणि शिक्षणामुळे दर वर्षी राज्यात शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचे विद्यार्थी नाव उंचावत आहेत. शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात शाळेतील विद्यार्थी नाव उंचावत आहेत. 
-सतीश भांबर, मुख्याध्यापक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com