विनाहॉर्न वाहन चालवा  अन्‌ बक्षीस मिळवा 

residenational photo
residenational photo

नाशिकः "कृपया हॉर्न नको...' याविषयी जनजागृती करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे अनोखी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होताना पंधरा किलोमीटर अंतर वाहन चालविताना हॉर्नचा आवश्‍यकतेपुरताच वापर करत ध्वनिप्रदूषण टाळणाऱ्या चालकांना बक्षीस दिले जाईल. दुचाकी व चारचाकी अशा दोन गटांत 5 मार्चला स्पर्धा होणार असून, नोंदणीची मुदत 3 मार्चपर्यंत आहे. 

स्पर्धेवर परिवहन कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, तसेच मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी नियंत्रक म्हणून असतील. स्पर्धेदरम्यान वाहनधारकाची वाहन चालविताना हॉर्न वाजविण्याची प्रवृत्ती, वाहनावरील नियंत्रण आणि स्पर्धेदरम्यान वाहनचालकाने किती वेळा हॉर्न वाजविला याची नोंद ठेवली जाईल. या नोंदीच्या आधारे दुचाकी व चारचाकी वर्गातून प्रथम तीन क्रमांक निवडण्यात येणार असून, त्यांना प्रायोजकांतर्फे रोख बक्षिसे दिले जातील. 5 मार्चला सकाळी साडेआठला प्रादेशिक परिवहन कार्यालय येथून स्पर्धेला सुरवात होईल. सहभागासाठी 3 मार्चपर्यंत ई-मेलद्वारे किंवा टपालामार्फत, स्वहस्ते अर्ज सादर करता येईल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना नो हॉंकिंगचा लोगो असलेली टोपी व स्टिकर दिले जाईल. 

अशा आहेत अटी व शर्ती 
"प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या तत्वावर शंभर दुचाकी व शंभर चारचाकी वाहनांना संधी दिली जाईल. सहभागासाठी कुठलेही शुल्क नसेल. स्पर्धेची सुरवात व समारोप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथून होईल. स्पर्धकाकडे वैध परवाना, वाहनाची कागदपत्रे असणे आवश्‍यक असेल. तसेच वाहन चालविताना हेल्मेट, सीटबेल्ट आवश्‍यक असेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com