खरेदीदार-विक्रेता संमेलनास  कृषी महोत्सवात मोठा प्रतिसाद 

live photo
live photo

नाशिकः जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी बचतगट व शेतकरी उत्पादक कंपनीतील शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळावा, तसेच बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा कृषी महोत्सवांतर्गत आयोजित जिल्हास्तरीय खरेदीदार- विक्रेता संमेलनाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
 
संमेलनाच्या माध्यमातून उत्पादक शेतकरी, निर्यातदार आणि खरेदीदार संस्थेचे प्रतिनिधी यांची एकाच ठिकाणी चर्चा घडवून आणण्यात आली. या वेळी विविध उद्योगसमूह, निर्यातदार, परदेशी कंपन्या यांचे पंचवीस प्रतिनिधी उपस्थित होते. बिग बझार, गोंगळ प्रोसेसिंग कंपनी, युनिक ऍग्रिकल्चर, फिल्डफ्रेश ऍग्रिकल्चर, टेक्‍निकल झोन, स्टार ऍग्री बाजार, केपरी कॉर्न आदींचा समावेश होता. सत्राच्या सुरवातीला विविध उत्पादनांबाबत असलेल्या अपेक्षा आणि उत्पादनाची गुणवत्ता यावर निर्यातदारांनी सखोल माहिती दिली. यात शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी निर्यातदारांची आर्थिक बाजू लक्षात घेणे, गत वर्षीची आयात-निर्यात आकडेवारी तपासून माल देणे, आर्थिक व्यवहारात पारदर्शकता यावी म्हणून करार पद्धतीचा अवलंब करण्याच्या सूचना उपस्थित तज्ज्ञांनी मांडल्या. या वेळी प्रश्‍नोत्तराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध शंकांचेही निरसन करण्यात आले. 

औपचारिक सत्रानंतर द्राक्षे, कांदा, डाळिंब, टोमॅटो, मिरची पॅकेजिंग विषयांशी संबंधित शेतकरी व खरेदीदारांची समोरासमोर चर्चा घडविण्यात आली. या वेळी शेतकऱ्यांनी खरेदीदारांशी समक्ष चर्चा करून माहिती घेतली. सत्राच्या समारोपात आत्माचे प्रकल्प संचालक अशोक कांबळे यांनी, शेतकऱ्यांनी खरेदीदारांची व्यवस्थित माहिती घेऊन कायदे करार करावा, असा आग्रह धरला. शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळावा म्हणून खरेदीदाराने शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रदर्शन येत्या रविवार (ता. 25)पर्यंत सुरू राहणार आहे. गुरुवारी अनेक महिलांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेटी देत सेंद्रिय शेतीसह अन्य बाबी जाणून घेतल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com