लज्जतदार खाद्ययात्रेत नाशिककरांनी मारला ताव 

residenational photo
residenational photo


नाशिक: झणझणीत रस्सा, कोंबडी वड्यांचा घमघमाट तर कुठे बिर्यानीचा दरवळ, कुळिथाच्या शेंगुळ्ये आणि पिठलं भाकरी ठेच्याचा गावरान ठसका या सगळ्या खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविणाऱ्या खाद्यसंस्कृती नाशिककरांच्या पसंतीस उतरत आहे निमीत्त आहे सकाळ फुड फेस्टिव्हलचे 

डोंगरे वसतीगृह येथे गेल्या तीन दिवसांपासून ही खाद्ययात्रा भरली आहे. एकुण 70 स्टॉलमध्ये भारतातील विविध खाद्यसंस्कृती चाखण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. फक्त मांसाहारीच नाही तर शाकाहाराच्या पदार्थांची रेलचेल आपल्याला खायला मिळते आहे. मालवण, कोल्हापूर येथील मांसाहारी जेवण तर नाशिक आदिवासी भागांतील नागलीचे पदार्थ अशा वैविध्यपुर्ण पदार्थांना चाखण्यासोबत गाण्याचा आस्वाद घेता येणार आहे म्युझीक लव्हर्स ऑक्रेस्ट्रा प्रस्तुत असलेल्या या गाण्यांच्या कार्यक्रमांत शुक्रवारी(ता.17) रोजी हिंदी चित्रपटांतील विविध गाणी सादर झाली. सहकुटुंब आलेल्या खाद्य- संगित रसिकांनी पतीपत्नीच्या आवडीची गाणी गाण्याचा आग्रह धरला फुड फेस्टिव्हलमधील वातावरण त्यामुळे संगीतमय झाले होते. सोनी पैठणीतर्फे रोज एक भाग्यवंतांना यावेळी बक्षिस म्हणून सेमी पैठणी भेट दिली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com