केसांच्या उत्तम आरोग्यासाठी प्या पाणी ःजावेद हबीब

residenational photo
residenational photo


नाशिकः केस स्वच्छ ठेवण्यासाठी शाम्पू उपयुक्त असला, तरीही केसांचे उत्तम आरोग्य राखण्यासाठी पाणी प्यायला हवे, असे हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांनी गुरुवारी (ता. 22) येथे सांगितले. रंग लावण्याने केस कोरडे पडू लागतात आणि हळूहळू कमी व्हायला लागतात, असेही त्यांनी हॉटेल एसएसके सॉलिटिअरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. 

क्रिकेटपटू, फूटबॉल खेळाडू केसांची वेगवेगळी रचना करतात. त्यामागे व्यावसायिकपणा असून, तो देखावा असल्याचे सांगून जावेद म्हणाले, की पूर्वी केशकर्तनालय होते. पुढे ब्यूटिपार्लर वाढले. अलीकडच्या काळात क्‍लिनिक वाढतात. म्हणजेच "वेलनेस'बाबत जागरूकता वाढत असल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. खरे म्हणजे केसांबाबत अनेक गैरसमजुती आहेत. केसांना तेल लावणे याचा त्यात समावेश आहे. पण तेलाचा आणि केसांच्या वाढीचा काहीही संबंध नाही. देशात सर्वसाधारणपणे केस दाट असतात. तेलाने केसांचा दाटपणा कमी होतो. तेलामुळे धूळ जमा होऊन केस खराब होण्याची शक्‍यता अधिक असते. त्यामुळे केसांना योग्य शाम्पू वापरून ते धुतल्यास केस चांगले राहतील. 

व्हायचे होते हॉटेल व्यावसायिक, झालो हेअर स्टायलिस्ट 
आपण चांगले दिसावे, त्याबद्दल जागरूकता वाढली आहे. ही गरज ओळखून कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे म्हणून जावेद हबीब अकादमी स्कूलची स्थापना करण्यात आली आहे. या अकादमीमधून नाशिकमधील दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले. मुळातच, जावेद यांना हॉटेल मॅनेजमेंटचे पदवीधर व्हायचे होते. लंडनमध्ये त्यांनी तयार खाद्यपदार्थांच्या शॉपीमध्ये काम केले. पण नंतर त्यांनी केसांची निगाविषयक अभ्यास पूर्ण केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com