हरभऱ्याने घेतला वर्षाच्या चिमुकल्याचा जीव 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

नाशिक: सिडकोतील हनुमान चौकात राहणाऱ्या एक वर्षीय सुजय याने खेळता-खेळता जमिनीवर पडलेला हरभरा तोंडात टाकला आणि तो गिळला असता श्‍वासनलिकेत अडकला. त्यामुळे त्यास काही क्षणात श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि काही वेळात त्याचा दुर्दैवी मृत्यु झाला. सुजय जयेश बिजुटकर (वय 1, रा. हनुमान चौक, सिडको) असे चिमुकल्याचे नाव असून त्याच्या मृत्युमुळे पालकांशीच शुद्धच हरपली तर, परिसरात शोककळा पसरली. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, सुजय हा आपल्या राहत्या घरामध्ये खेळत होता. वर्षभराचा असलेल्या सुजयच्या हाती हरभरा लागला आणि त्याने तो तोंडात टाकला. सदरची बाब घरातील कोणाच्याही लक्षात आली नाही. मात्र, काही क्षणात त्याला ठसका लागला आणि त्यास श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागला. घरातील मंडळीनी त्यास तातडीने नजिकच्या रुग्णालयात नेले परंतु तोपर्यंत त्यास श्‍वास न घेता आल्याने त्याचा मृत्यु झाला. तातडीने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. 
शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह देण्यात आला असता, शवविच्छेदनामध्ये सुजयने गिळलेला हरभऱ्याचा दाणा त्याच्या श्‍वास नलिकेमध्ये अडकला होता. त्यामुळेच त्याला श्‍वास घेता न आल्याने त्याचा मृत्यु झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र सदरच्या प्रकारामुळे त्याच्या पालकांना मोठा धक्का बसला असून परिसरातही शोककळा पसरली. अतिशय गोंडस असा सुजय गमावल्याने त्याच्या पालकांची शुद्धच हरपली होती. याप्रकरणी अंबड पोलिसात नोंद करण्यात आली आहे. 

Web Title: marathi news harbhara

टॅग्स