घोड्याच्या धडकेने थोडक्यात बचावला प्रेक्षक ....!

1
1

        नाशिकः   येवला-नांदगाव मार्गावरील वडगाव रेल्वे गेट जवळील मैदानावर नुकत्याच झालेल्या घोड्यांची शर्यतीदरम्यान शर्यत सुरु असतांना मध्ये येणारा प्रेक्षक थोडक्यात बचावला. या घटनेने सर्वांच्याच काळजाचा ठोका चूकला.
य़ा शर्यतीत विविध जातीचे देशभरातील अनेक उंचपुरे रेसिंग घोडे बघण्याची संधी या निमित्ताने येवलेकारांना मिळाली. देशभरातील घोडेशौकीन  या ठिकाणी  आले होते. या स्पर्ध्येत १०० घोड्यांनी सहभाग नोंदविला.  बैल गाडी शर्यतीवर बंदी असल्याने या शर्यतीकडे राज्याचे लक्ष  लागले होते.  घोड्याच्या शर्यतीतील प्रमुख नियम घोड्याला कोणतीही इजा नकरता , चाबूक चा वापर न करता त्याच्यावर बसून रेस पूर्ण करायची...यामुळे येवल्या मधून आठ ते दहा प्रेक्षक सायंकाळ पर्यंत येथे आले. गर्दी वाढत असतांना आयोजन अनेक वेळा माईक वरून मैदानात जाऊ नका. हि विनंती करीत होते पण बघे ऐकण्याच्या पलीकडे होते. एक किमी अंतराच्या रेसकोर्स मध्ये शेकडो प्रेक्षक मध्यभागी उभे राहून समोरील  १२० टे १५० च्या गतीने येणाऱ्या घोड्या समोर उभे राहून हि स्पर्धा बघत होते. घोड्याची शक्ती अफाट असते हॉर्स पावर जगभरात प्रसिद्ध आहे. त्याची एक धडक मृत्यूला आमंत्रण देवू शकते. पण जीवाची पर्वा न करता स्पर्धा सुरु असतांना एक प्रेक्षक नशीब बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावला. शर्यतीत असतांना दहा  घोड्यांमधील चार घोडे पुढे गेल्यावर हा प्रेक्षक थेट मैदानात आला आणि मागे न बघता कोणता घोडा जिंकतो .हे बघू लागला पण मागून आणखी सहा घोडे येत आहे हे तो विसरला होता. त्यातील एका घोड्याने त्याला जोरदार धडक दिली तो पाच फुट उंच उडून जमिनीवर कोसळला आणि बेशुद्ध पडला. आयोजकांनी ताबडतोब त्याला उचलून बजुला घेतले औषधोपचार केले आणि तो शुद्धीवर आला पण त्याच्या हात पायाला मुकामार लागला होता. त्याला दवाखान्यात घेवून गेले पण या प्रसंगाने अनेक प्रश्न उपस्थित होतात. 

            येवला शहरा मध्ये आम्ही तीन वर्षा पासून हि स्पर्धा भरवित आहोत देशभरातील शेकडो घोडे या स्पर्ध्येत सहभागी होतात. स्पर्धा बघण्यासाठी कोणतेही शुल्क नसते. हि प्रेक्षक नियमांचे पालन करत नाही. आम्ही माईक वरून ओरडून ओरडून सांगतो पन प्रेक्षक ऐकत नाही आणि मग घोड्याने त्याची अश्व ताकद दाखविल्यावर त्यांना अक्कल येते प्रेक्षकांनी मैदाना बाहेरूनच स्पर्धा बघितली पाहिजे असे आमचे मत आहे -  
नगरसेवक झामभाऊ जावळे,आयोजक ,घोडे स्पर्धा येवला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com