ग. स. सोसायटीच्या अध्यक्षपदी विलास नेरकर

Jalgao
Jalgao

जळगाव : जळगाव जिल्हा सरकारी नोकरांच्या सहकारी (ग. स.) सोसायटीच्या अध्यक्षपदी विलास नेरकर तर उपाध्यक्षपदी कैलास चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्ह्यातील सरकारी नोकर व शिक्षकांची 35 हजार सभासद असलेली ही सर्वात मोठी संस्था आहे. सोसायटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी आज (ता. 9) सोसायटीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हा सहाय्यक सहकारी निबंधक डी. ए. शेळके होते. अध्यक्षपदासाठी विलास नेरकर व उपाध्यक्षपदासाठी कैलास चव्हाण यांनी अर्ज दाखल केले होते. दोन्ही सहकार गटाचे असून याच गटाचे बहुमत आहे. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड पिठासन अधिकारी डी. ए. शेळके यांनी घोषित केली. 

अध्यक्ष नेरकर यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. 2008-09 या कालावधीतही ते सोसायटीचे अध्यक्ष होते. ते भडगाव येथे जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत. उपाध्यक्ष कैलास चव्हाण यांना प्रथमच संधी मिळाली असून, ते कानळदा येथील माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आहेत. सहकार गटाचे मार्गदर्शक बी. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही पदे निश्‍चित करण्यात आली. सर्व संचालक मंडळाने त्यांना पाठींबा दर्शविला. गटनेते उदय पाटील यावेळी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com