जळगावात 31 उमेदवार कोट्यधीश ! 

जळगावात 31 उमेदवार कोट्यधीश ! 

जळगाव ः महापालिका निवडणूक रिंगणातील 303 उमेदवारांमध्ये तब्बल चौदा महिला, तर 17 पुरुष असे एकूण 31 उमेदवार कोट्यधीश आहेत. गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेले उमेदवारांची संख्या 36 आहे, तर उच्चशिक्षित 79 उमेदवार आहे. 

महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या 303 उमेदवारांची शैक्षणिक तसेच मालमत्ता आदी माहिती मनपाच्या सांकेतिक स्थळावर निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार आज प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये 19 प्रभागात 75 जागांसाठी 303 उमेदवारांनी शपथ पत्रे भरून दिले आहेत. शपथ पत्रात दिलेल्या माहितीवरून निवडणूक रिंगणातील 31 उमेदवार हे कोट्यधीश आहेत. तर 264 उमेदवार लखपती असल्याची माहिती समोर आली आहे. 

आमदाराच्या पत्नी मालामाल 
मनपा निवडणुकीच्या रिंगणात भाजप व शिवसेनेच्या आमदार यांच्या पत्नी रिंगणात आहे. यात आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नीकडे सुमारे जंगम व स्थावर अशी 50 कोटीची मालमत्ता तर आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे यांच्याकडे 19 कोटीची मालमत्ता आहे. 

199 अल्पशिक्षित उमेदवार 
निवडणूक रिंगणातील 303 उमेदवारांपैकी 79 उमेदवार हे उच्चशिक्षित आहेत, तर 10वी, 12 वी पास झालेले 111 उमेदवार, 9वी ते 5वी पर्यंत शिक्षण झालेले 88 उमेदवार आहेत. वीस उमेदवार अशिक्षित आहेत. 

36 उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी 
निवडणूक रिंगणात 36 उमेदवार गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे आहे. यात भाजपच्या 15 उमेदवारांवर सर्वाधिक गुन्हे, शिवसेनेचे 9 , आघाडीच्या 4, अपक्ष 6, एमआयएम व कम्युनिस्ट पार्टीच्या प्रत्येकी एका उमेदवारावर गुन्हे दाखल आहे. कॉंग्रेसच्या एकाच उमेदवारावर तब्बल 7 गुन्हे दाखल झालेले आहे. 
 
टॉप टेन कोट्यधीश 
लता सोनवणे, सीमा भोळे, अंजनाबाई सोनवणे, दीपमाला काळे, शिवचरण ढंढोरे, रजनी अत्तरदे, सिंधू कोल्हे, रवींद्र पाटील, ललित कोल्हे, नितीन लढ्ढा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com