बस तिकिट विक्रीकरीता एजन्सीमार्फत खासगी वाहक! 

राजेश सोनवणे
सोमवार, 11 जून 2018

जळगाव ः राज्यात ठिकठिकाणी महामंडळाच्या विना वाहक बससेवा सुरू आहे. स्थानकात प्रवाशांचे तिकिट फाडल्यानंतर तेथून बस सुटल्यानंतर थेट शेवटच्या स्थानकावर जावून थांबते,मात्र मार्गावरील गर्दीच्या थांब्यांवरील प्रवासी घेण्यासाठी तिकिट विक्रीकरीता खासगी एजंट नेमण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. सदर काम ट्रायमॅक्‍स कंपनीद्वारे करण्याचे देखील निश्‍चित झाले आहे. 

जळगाव ः राज्यात ठिकठिकाणी महामंडळाच्या विना वाहक बससेवा सुरू आहे. स्थानकात प्रवाशांचे तिकिट फाडल्यानंतर तेथून बस सुटल्यानंतर थेट शेवटच्या स्थानकावर जावून थांबते,मात्र मार्गावरील गर्दीच्या थांब्यांवरील प्रवासी घेण्यासाठी तिकिट विक्रीकरीता खासगी एजंट नेमण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. सदर काम ट्रायमॅक्‍स कंपनीद्वारे करण्याचे देखील निश्‍चित झाले आहे. 

राज्य परिवहन महामंडळाने उत्पन्न वाढीच्या दृष्टीने राज्यात विविध मार्गावर नियमित फेऱ्यांसोबतच अतिरिक्‍त विनावाहक फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. विना थांबा धावणाऱ्या या बसफेऱ्यांना प्रवाशांचा प्रतिसाद देखील मिळत आहे. परंतू,गर्दीच्यावेळी विनावाहक बस जाणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी प्रवाशी उभे असतात मात्र मार्गावरील थांब्यावर असलेल्या प्रवाशांचे तिकिट घेण्यासाठी बसमध्ये वाहक नसल्याने बस थांबविणे देखील शक्‍य नसते. परिणामी प्रवाशी हा खासगी वाहनांमधून प्रवास करत असतो. हा प्रकार रोखण्यासाठी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. 
 
खासगी एजंटची नेमणूक 
राज्य परिवहन महामंडळाने ट्रायमॅक्‍स कंपनीला खासगी एजंट नेमण्याचे काम दिले आहे. राज्य व राज्याबाहेरील फेऱ्यांकरीता सदरची कंपनी ही प्रादेशिक वितरक नेमतील. यामध्ये प्रत्येक विभागाचा आणि अन्य राज्यांचा समावेश असेल. तसेच प्रत्येक विभागास विभागीय वितरक नेमून त्याच्या अखत्यारीत प्रशासकांची नेमणूक करण्यात येईल. या प्रशासकांच्या नियंत्रणाखाली आवश्‍यकतेनुसार थांब्यांवर प्रवासी तिकिट विक्रीकरीता एजंटची नेमणूक केली जाणार आहे. ही नेमणूक करण्यासाठी विभागीय वितरकाकडून ठरावीक थांब्यांवर एजंट नेमण्यासाठीच्या प्रस्तावास विभाग नियंत्रकांच्या मंजूरीनंतरच नेमणूक होईल. नेमण्यात आलेले एजंट हे प्रवाशांना इटीआयएमद्वारे चालू बुकिंगचे तिकिट देवून प्रवाशांना बसमध्ये बसवतील. 
 
कंपनीकडून आगाऊ भरणा 
एजंट नेमल्यानंतर यामध्ये काही अफरातफर होवू नये,याकरीता ट्रायमॅक्‍स कंपनीकडून आगाऊ रक्‍कमेचा भरणा करून तेवढ्याच रक्‍कमेची तिकिट उपलब्ध करून देणार आहे. याकरीता महामंडळाकडे एक वॉलेट तयार करण्यात येणार असून, त्यामध्ये दहा लाख रूपये असतील. यापेक्षा कमी रक्‍कम झाल्यास सदरची कार्यप्रणाली आपोआप बंद करण्याची तरतुद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सिस्टीम जनरेटेड अहवालानुसार झालेली तिकिट विक्री व तिकिटांची रक्‍कम यात तफावत राहू नये; याकरीता विशिष्ट अशी कार्यप्रणाली तयार केली आहे. 
 

"विनावाहक बससाठी तिकिट देण्याकरीता ट्रायमॅक्‍स कंपनीकडून एजंट नेमण्याबाबतची प्रक्रिया महामंडळाकडून सुरू आहे. विभागीय कार्यालयाला याबाबतचे पत्र आले आहे. ही प्रक्रिया राज्यस्तरावरची असून वरच्यास्तरावरून निविदा प्रक्रिया राबवून एजंट नेमण्यात येतील.' 

- प्रज्ञेश बोरसे, आगार प्रमुख, जळगाव.

Web Title: marathi news jalgaon bus privet conductor