मालेगावच्या बालीकेची जळगाव मार्गे गुजरातला विक्री

residentional photo
residentional photo

जळगाव : शहरातील बसस्थानकावरुन गुजरात येथे पाठवल्या जात असलेल्या पंधरा वर्षीय बालीकेला जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पस्तीस वर्षीय निब्बर व्यक्ती सोबत ऐंशी हजारात या मुलीचा सौदा झाल्याची खात्रीलायक माहिती समोर आली असुन जळगावच्या शिवाजीनगरातील मॅरेज ब्युरो चालवणाऱ्या महिलेसह लग्न लावून नेणारा नवरा या प्रकरणातील दलाल अशा तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असुन या प्रकरणी चौकशी अंती गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे निरीक्षक सुनील गायकवाड यांनी सांगीतले. 

मालेगाव येथील मुळ रहिवासी रविना रविंद्र मोरे (वय-15-नाव काल्पनीक आहे) या अल्पवयीन तरुणी सोबत जळगाव बसस्थानकावर काल रात्री सोबतच्या लोकांबाबत बाचा बाची सुरु होती. प्रकरण वेगळेच दिसल्याने येथील रिक्षा चालकाने जिल्हापेठ पोलिसांना फोन केल्यावर निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या पथकातील मनोज कोळी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी बस स्थानकावर जावुन रविना सहीत तिघांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले होते. ताब्यात घेतलेल्यांची कसुन चौकशी केल्यावर घडला प्रकार समोर आला, पिडीता रविना मोरे हि मुळ मालेगाव येथील रहिवासी असून 5 मे2018 रोजी तीला मालेगाव येथून जळगावला आणण्यात येवून शिवाजीनगरातील मॅरेज ब्युरोच्या माध्यमातून साध्या स्टॅम्प पेपर वर संमती पत्र लिहून घेत धर्मेश नटवरलाल चुडासामा (वय-35,रा.राजकोट) याच्या सोबत लग्न लावून देण्यात आले त्यानंतर या मुलीला जळगाव बसस्थानकावरुन राजकोट(गुजरात)कडे रवाना करण्यात येत असतांना पिडीता रविना, लग्न करणारा धर्मेश, अजमल शहा जुम्मा शहा(वय-45, राजकोट), मॅरेज ब्युरोची संचालक महिला नजमाबेग सरफराज राठोड (वय-35, शिवाजीनगर), भानु हासम शहा (वय-52,राजकोट) अशा चौघांसह पिडीतेला ताब्यात घेण्यात आले आहे. पिडीतेच्या आईला पोलिसांनी बोलावले असून नेमक्‍या प्रकाराचा उलगडा झाल्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करीत असल्याचे गायकवाड म्हणाले. 

लग्नाचे दस्तऐवज जप्त 
पोलिसांनी बसस्थानकावर दोघा तिघांना ताब्यात घेतल्यावर धर्मेश चुडासामा याच्या हातातील कागदपत्रांचे भेंडोळे त्याने भिंतीच्या पलिकडे फेकुन दिले. नंतर ते पोलिसांनी शोधुन काढल्यावर 

ऐंशी हजारात ठरला व्यवहार 
मुलीच्या पालकांना ऐंशी हजार रुपये द्यायचे आणि वरचा खर्च, मॅरेज ब्युरो आणि संबधीत राजकोटच्या दलालाची ठरलेली फि देऊन लग्नासाठी मुलींची खरेदी विक्री करणारे आंतर राज्यीय रॅकेट कार्यरत असल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली असुन या प्रकरणात अधीक तपास सुरु आहे. 

मी, यांना ओळखतच नाही 
पिडीता रविनाशी बोलणे केल्यावर, तीने तिच्या सोबत लग्न लावून घेतलेल्या व त्याच्या सोबतच्यांना कुणालाही आपण ओळखत नसल्याचे सांगीतले, माझी बहीण भुसावळ येथे दिली असल्याने तीच्या कडे जात असल्याचे सांगून मालेगावहुन येथे आणण्यात आल्याचे तीने सकाळ शी बोलतांना सांगीतले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com