कापसाला यंदा 5700 चा भाव देणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

जळगाव ः गतवर्षी कपाशी पिकावर पडलेल्या बोंडअळीने शेतकऱ्यांपासून जीनिंग-प्रेसिंगपर्यंतच्या सर्वांनाच मोठी आर्थिक झळ सोसावी लागली. बोंडअळीने गत हंगामात कपाशीचा दर्जाही फारसा चांगला नव्हता. यामुळे खानदेशातून कापूस निर्यातीचे प्रमाण कमी होते. यंदा केवळ दोन हजार गाठी खानदेशातून निर्यात झाल्या. यावर्षी मात्र खानदेशातील कापसाला चीनमध्ये मोठी मागणी राहील. शेतकऱ्यांनी चांगला कापूस आणल्यास पाच हजार सातशे रुपये भाव दिला जाईल, अशी माहिती खानदेश जीनिंग-प्रेसिंग मिल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन, अरविंद जैन आदी संचालकांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

चीनच्या अंतर्गत कापसाचा बफर स्टॉक कमी झालेला आहे. चीनला त्याचा बफर स्टॉक मेन्टेन करावा लागतो. यामुळे भारतातून चीन कापसाची मागणी करेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. यामुळे चीनसह बांगलादेश, व्हिएतनाम, इंडोनेशिया, पाकिस्तान, तुर्की आदी ठिकाणी खानदेशच्या कापसाला चांगली मागणी राहील. यामुळे शेतकऱ्यांनी अधिकाधिक चांगले वाण घेऊन पेरा करावा. 

भाव जादा राहणार 
शेतकऱ्यांनी कपाशीचे वाण लावताना रुईचा अधिक उतारा देणारे वाण लावावेत. उत्पादन आल्यानंतर रुई व कापसाची वेचणी वेगळी करावी. रुई व कापूस एकत्र करू नये. जीनिंगवर कापूस वेगळा व रुई वेगळी आणल्यास त्याचा उतारा तपासून अशा रुई व कापसाला जादा भाव दिला जाईल, असे श्री. जैन यांनी सांगितले. 
 
स्वतः विकण्यास आणावा 
शेतकऱ्यांनी कापूस व रुई विकण्यासाठी स्वतः आणावे. त्यात दलाल किंवा मध्यस्थ टाकू नये. स्वतः कापूस विकण्यास येणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक भावाचा लाभ मिळेल. खानदेशात 150 जीनिंग कारखाने आहेत. त्यातील शंभरच सुरू आहेत. आता कापूस जवळपास संपला आहे. यंदा 10 ते 20 टक्के गाठींची निर्मिती कमी झाली. या हंगामात शेतकऱ्यांना उत्पादन चांगले यावे, यासाठी "शेतकरी सुखी तर जग सुखी' हे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर पुस्तक मोफत दिले जाईल. त्यात कपाशी लागवडीपासून विविध टप्प्यांत काय करावे म्हणजे उत्पादन अधिक येईल, याबाबत मार्गदर्शन दिलेले आहे. शेतकऱ्यांनी याचा उपयोग घेऊन उत्पादन वाढवावे, असे आवाहन करण्यात आले.

Web Title: marathi news jalgaon cotton 5700 rate