कपाशीवर आतापासूनच गुलाबी बोंडअळी 

कपाशीवर आतापासूनच गुलाबी बोंडअळी 

जळगाव ः गतवर्षीच्या हंगामात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव संपूर्ण राज्यात झाला होता. यामुळे कपाशीच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात झाला होता. यामुळे बोंडअळीचा नायनाट करण्यासाठी कपाशीच्या काड्या जाळण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अजूनही कपाशी पीक पंधरा- वीस दिवसांचेच झालेले असतानाही त्यावर गुलाबी बोंडअळी पडल्याचे भडगाव तालुक्‍यात शेतभेटीत दिसून आल्याचे आज कृषी समितीच्या बैठकीत सांगण्यात आले. 
जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची बैठक सभापती तथा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत प्रामुख्याने कापूस पिकावरील बोंडअळीचा प्रादुर्भाव व कीटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची काळजी यावर चर्चा करण्यात आली. सदर बैठकीत राज्य शासनाच्या कृषी विभागाचे कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी शेतभेटीत भडगाव तालुक्‍यात गुलाबी बोंडअळीचे पतंग आढळून आल्याचे सांगितले. याची पुढची अवस्था मादी पतंगाने फुलांमध्ये अंडी घालणे व त्यातून बाहेर पडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव असल्याचे सांगितले. 
 
फेरोमेन सापळे उपलब्ध 
बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाने तयारी केली असून, बोंडअळीचे पतंग जाळ्यात अळकविण्यासाठी "फेरोमेन सापळा' उपलब्ध करण्यात आला आहे. प्रत्येक कृषी केंद्रावर फेरोमेन सापळे विक्रीस ठेवण्यात आले असून, कृषी विभागामार्फत देखील एकरी पाच सापळे अनुदानावर वाटप करण्यात येणार आहेत. याचा वापर कीटक थर्मामिटर म्हणून होऊन सलग दोन दिवस आठ ते दहा पतंग सापळ्यात आढळून आल्यास फवारणी केल्यास बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखता येणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणात सापळे लावून यात गुलाबी बोंडअळीचे नर पतंग अडकवणे व त्यांना नष्ट केल्याने पुढील प्रजनन थांबविता येणार असल्याचे सांगण्यात आले. 
 
निंबोळी अर्कची फवारणी 
बोंडअळी रोखण्यासाठी निंबोळी अर्कची फवाणी केल्यास देखील अळीचा प्रसार रोखणे शक्‍य आहे. लिंबाच्या पानापासून अर्क तयार करून फवारणी केल्यास त्याचा उपयोग होतो. यासोबतच शेतात पक्षी थांबे (ऍण्टीने) लावावेत. यावर पक्षी बसून ते अळी वेचून खातील आणि बोंडअळीचे नियंत्रण होईल. यामुळे शेतकऱ्यांनी फेरोमेन सापळे, निंबोळी अर्क, पक्षी थांबे, सापळा पिके याचा उपयोग करून नियंत्रण करण्याचे आवाहन उपाध्यक्ष महाजन यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com