विद्यूत तारांच्या स्पर्शाने कापसाचा ट्रक पेटला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

जळगाव ः जळगाव भुसावळ महामार्गावरील कालिंका माता मंदिरापासून काही अंतरावरील फळ व भाजीपाला खरेदी विक्री संघाबाहेर कापसाच्या गाठी घेवून जाणाऱ्या ट्रकचा विद्युत तारांना स्पर्श झाला. तारांची स्पार्किंग झाल्याने ट्रकमधील असलेल्या कापसाच्या गाठींना आग लागल्याची घटना आज दुपारी बारा वाजता घडली. या घटनेत लाखो रुपये किंमतीच्या कापसाच्या गाठी जळून खाक झाली. मनपाच्या अग्निशमन विभागाच्या दोन बंबाच्या मदतीने आग विझविण्यात आली. 

मिळालेली माहितीनुसार, नागपूरवरून मुंबईला लाखो रुपये किंमतीच्या कापसाच्या गाठी घेवून जाणारा एमएच 19 झेड 5389 क्रमांकाचा ट्रक दुपारी जळगावकडे येत होता. महामार्गावरील फळ व भाजीपाला खरेदी विक्री संघाजवळ थांबला. याचवेळी ट्रकच्या वरती असलेल्या विद्युत तारांना ट्रकला स्पर्श झाल्याने स्पार्किंग झाली. स्पार्किंग झाल्याने कपाशीच्या गाठीना आग लागली. ट्रक मालक चालक प्रविण उध्दवसिंग पाटील (रा.जळगाव) यांना आग लागल्याची समजताच. खाली उतरून जीव वाचविला. तसेच परिसरातील नागरिकांनी घटनेची तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली. दोन बंबानी तत्काळ घटनास्थळी येवून आगीवर नियंत्रण मिळविले. 

दोन बंबानी आगीवर नियंत्रण 
ट्रकच्या वरील भागाचा तारांना स्पर्श झाला. याच वेळी स्पार्किंग होवून ट्रकच्या वरील कॅबीनच्या वरील भागातील कपाशीच्या गाठी आग लागली. कपाशीने गाठींने त्वरित पेट घेतल्याने आग वाढत होती. त्यातच तत्काळ महापालिकेचे दोन अग्निशमन बंब दाखल होवून दिड तासानंतर आग विझविण्यात यश आले. ट्रकमधील 125 कपाशीच्या गाठी पूर्णपणे जळून खाक झाल्या असून लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचे समजते.

Web Title: marathi news jalgaon cotton truck