"सकाळ'मधील बोधकथांवर आधारित "ई-बुक'चे बाळदला प्रकाशन 

live photo
live photo

पाचोरा ः बाळद बुद्रुक (ता. पाचोरा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक अरुण पाटील यांनी "सकाळ'मधील बोधकथा व सुविचार संग्रहित करून त्याची "ऑनलाइन' पुस्तिका तयार केली आहे. त्याचे प्रकाशन व लोकार्पण आज वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून करण्यात आले. 

अलीकडच्या काळात शाळा डिजिटल करण्याचे विचार आणि प्रयत्न विकसित होत आहेत. विद्यार्थ्यांना सक्षम, सुजाण व नैतिक बनवून आदर्श नागरिक व संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी "सकाळ'मधून दररोज बोधकथा प्रसिद्ध केली जाते. या कथांचा संग्रह करून व त्याला "सकाळ'मधील सुविचारांची सुरेख जोड देऊन अरुण पाटील यांनी "ऑनलाइन' पुस्तिका तयार केली. त्याची "लिंक'ही "सोशल मीडिया'वर व्हायरल केली आहे. आज बाळद येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत प्रकाशन सोहळा झाला. प्रांताधिकारी राजेंद्र कचरे अध्यक्षस्थानी होते. गटविकास अधिकारी गणेश चौधरी, गटशिक्षणाधिकारी विकास पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी सरोज गायकवाड, ग्रामविकास अधिकारी श्री. सैंदाणे, मुख्याध्यापक प्रमोद पाटील, उपशिक्षक संजय मोरे, लीना पाटील, दिलीप सोनवणे, विजया पाटील, सतीश सोनवणे उपस्थित होते. पुस्तिकेत अरुण पाटील यांची प्रस्तावना असून एकूण 82 पाने आहेत. प्रत्येक पानावर बोधकथा व सुविचार अतिशय आकर्षक पद्धतीने मांडण्यात आला आहे. 

मोबाईलवरही उपलब्ध 
प्रत्येक शाळेत दररोज सकाळी प्रार्थनेनंतर या परिपाठाचे सादरीकरण करता यावे, रोज एक विद्यार्थी या "ऑनलाइन' पुस्तिकेतील बोधकथा व सुविचार सर्वांसमोर वाचेल, असा अरुण पाटील यांचा यामागील प्रयत्न आहे. विशेष म्हणजे, ही पुस्तिका "मोबाईल'वरही उपलब्ध आहे. याप्रसंगी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी "सकाळ'मधील बोधकथा, सुविचार व अरुण पाटील यांच्या या संग्रहाबाबत गौरवोद्‌गार काढले. यामुळे विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता वाढून नैतिक मूल्यांची रूजवात करणे शक्‍य होईल असे त्यांनी सांगितले. शिक्षण विस्तार अधिकारी सरोज गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. अरुण पाटील यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप सोनवणे यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com