महापालिका निवडणुक ः मतदान केंद्रावर दुपारनंतर रांगा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

जळगाव ः महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2018 साठी मतदान प्रक्रिया पार पडली. महापालिकेच्या 19 प्रभागांत झालेल्या मतदान प्रक्रियेला सकाळच्या अल्प प्रतिसादानंतर दुपारी चारनंतर मात्र प्रचंड गर्दी झाल्याने केंद्राच्या बाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. यामुळे उशिरापर्यंत मतदानाची प्रक्रिया होणार असल्याने याची टक्‍केवारी स्पष्ट झाली नसली तरी पाच वाजेपर्यंत 40 ते 45 टक्‍के मतदान झाल्याचा अंदाज आहे. 

जळगाव शहर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (ता.1) मतदान प्रक्रिया झाली. एकूण 19 प्रभागांमधील 75 जागांसाठी 303 उमेदवार भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झाले. भाजप- शिवसेना यांच्यातील काट्याची लढत जवळपास सर्वच प्रभागांमध्ये पाहण्यास मिळाली. मतदान प्रक्रियेला सकाळी साडेसातपासून सुरवात होवून सायंकाळी साडेपाचपर्यंत ही प्रक्रिया पार पडली. साडेपाचनंतर मतदान केंद्राचे गेट बंद करून मतदारास आत प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला. शहरातील 19 प्रभागांमध्ये झालेल्या प्रक्रियेत मतदानात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 35 टक्‍के मतदान झाले होते. मात्र कॉलन्यांमध्ये "वोटसाठी नोट' चालल्याने चार वाजेनंतर मतदार घराच्या बाहेर पडून केंद्रावर आला होता. यामुळे केंद्राबाहेर लांब रांगा लागलेल्या होत्या. सायंकाळी साडेपाच वाजेनंतर देखील मतदार येण्याचे सुरू होते. परंतू, साडेपाचनंतर मतदान बंद करण्यात आल्याने केंद्रात आलेल्यांनाच मतदान करण्याची संधी मिळाली. मतदानाचा प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतरच मतदानाची एकूण टक्‍केवारी समोर येणार आहे. तरी सायंकाळी पाच वाजेपर्यंत साधारण 45 टक्‍के इतके मतदान झज्ञल्याचा अंदाज आहे. 

Web Title: marathi news jalgaon election long voter line