प्रभाग क्रमांक सतरा - नवीन चेहऱ्यांची राजकीय पदार्पणासाठी लढत 

प्रभाग क्रमांक सतरा - नवीन चेहऱ्यांची राजकीय पदार्पणासाठी लढत 

जळगाव शहरातील औद्यागिक वसाहत परिसरातील हा प्रभाग क्रमांक सतरा आहे. अयोध्यानगर, शांती निकेतन सोसायटी, अजिंठा हौसिंग सोसायटी, रायसोनी शाळा परिसर, ट्रान्स्पोर्ट नगर, म्हाडा कॉलनी, एस.टी.वर्कशॉप, सदोबा नगर, कासम वाडी, पांजरा पोळ असा हा मोठा परिसर आहे. या प्रभागात एकही विद्यमान नगरसेवक नाही. सर्वच पक्षांनी नवीन चेहऱ्यांना संधी दिलेली आहे. त्यामुळे राजकीय पदार्पणात प्रवेशासाठी त्यांच्यात स्पर्धा असणार आहे. 

सामाजिक रचनेत हा लेवा पाटील बहुल क्षेत्र आहे. यात 17 हजार तीस मतदान असून तब्बल 9 ते 10 हजार लेवा पाटील मतदार आहे. त्या खालोखाल तीन हजार मराठा मतदार आहेत. मारवाडी समाजाचे एक हजार व सोनार समाजाचे हजार मतदान आहे. त्यामुळे पक्षांनी उमेदवार देताना सामाजिक रचनाही केल्याचे दिसत आहे. 

"अ"गटात दुरंगी लढत 
प्रभागातील "अ'गटात दुरंगी लढत आहे. यात शिवसेनेतर्फे सुचित्रा युवराज महाजन व भाजपतर्फे मीनाक्षी गोकूळ पाटील यांची उमेदवार आहे. यात सुचित्रा महाजन या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. तर मीनाक्षी पाटील या गेल्या वेळी भाजपतर्फे उमेदवार होत्या यावेळी पुन्हा त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

माजी नगरसेविका रणांगणात 
"ब'गटात माजी नगरसेविका मीनाक्षी लीलाधर सरोदे या पुन्हा नशीब आजमावत आहेत. गेल्या वेळी त्या पराभूत झाल्या होत्या. यावेळी त्या शिवसेनेतर्फे निवडणूक मैदानात आहेत. भाजपतर्फे रंजना सोनार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या वेळी त्यांनी खानदेश विकास आघाडीतर्फे निवडणूक लढविली होती. यावेळी त्यांनी भाजपकडून नशीब आजमावत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे प्रा. नीलिमा काशिनाथ खडके निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या पतीचे मेडिकल स्टोअर्स आहे. तर याच गटात लता भरत साबळे अपक्ष आहेत. 

"क"गटात दुरंगी लढत 
"क"गटात दुरंगी लढत आहे. भारतीय जनता पक्षाचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते वामनराव खडके यावेळी निवडणूक मैदानाच्या बाहेर असून भाजपने त्यांचे चिरंजीव सुनील खडके यांना उमेदवारी दिली आहे. ते प्रथमच निवडणूक लढवीत आहेत. तर त्यांच्या विरोधात शिवसेनेतर्फे प्रकाशचंद लालचंद जैन रिंगणात आहेत. शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचे ते कट्टर समर्थक आहेत. 

आमदार भोळेंचे शालक मैदानात 
"ड'गटात भारतीय जनता पक्षातर्फे विश्‍वनाथ सुरेश खडके यांना उमेदवारी दिली आहे. ते आमदार सुरेश भोळे यांचे शालक आहेत. शिवसेनेतर्फे या गटात उमेदवार नाहीत, मात्र हर्षल जयदेव मावळे या अपक्ष उमेदवारांना शिवसेनेने पुरस्कृत केले आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे गजानन आनंद देशमुख यांची उमेदवारी आहे. त्यांचा डेअरीचा व्यवसाय असून या भागात चांगला संपर्क आहे. तर दगडू बन्सी सपकाळे, सुमेध पद्‌माकर सोनवणे (अपक्ष) उमेदवारही मैदानात आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com