शेतकऱ्यांच्या देशव्यापी संपास धरणे आंदोलनाने सुरवात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

जळगाव ः शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, शेतमालाला दीडपट भाव द्यावा, वीजबिल माफ करावे, दुधाला पन्नास रुपये दर मिळावा यांसह विविध मागण्यांसाठी विविध शेतकरी संघटनांनी आजपासून देशव्यापी संप सुरू केला आहे. आज चोपडा, चाळीसगावसह अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी तहसिल कार्यालयासमोर निदर्शने केली. राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांना मागण्याचे निवेदन तहसिलदारांमार्फत दिले आहे. अनेकांनी भाजीपाला, दुध बाजार समित्यामध्ये विक्रीस आणले नाही. 

शेतकरी सुकाणू समितीचे सदस्य एस.बी.पाटील, राष्ट्रीय किसान महासंघाचे अनिल पाटील, अजित पाटील, नंदकिशोर सांगोळे, सुनिल पाटील, चंद्रशेखर पाअील, जयंत पाटील, राकेश भदाणे, ऍड.हेमचंद्र पाटील यासह असंख्य शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. 
 
दोन दिवसानंतर झळ पोचणार 
शेतकऱ्यांनी आंदोलनास सुरूवात केल्याने संघटनांनी ठरविल्याप्रमाणे नागपूर, पुणे, नाशिक व मुंबई या शहरांचा दूध, भाजीपाला व अन्नधान्याचा पुरवठा बंद करण्यात आला. जळगावसह नाशिक विभागात दुध, भाजीपाला विक्री सूरूच राहील. मात्र विविध मार्गाने आंदोलन सूरू राहील. वरील शहरांना दोन दिवसांनी आंदोलनाची झळ पोचेल. 
 
उद्या​ रस्तारोको 
उद्या (ता.2) प्रत्येक तालुक्‍यात शेतकरी रस्तारोको आंदोलन करतील. रस्तारोको बाबत शेतकऱ्यांनी कोणी कोठे रस्ता रोको करावयाचे याबाबत नियोजन केले आहे.

Web Title: marathi news jalgaon former strike