अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयीतास अटक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

शिरपूर : शेतात काम करणाऱ्या मजूर दाम्पत्याच्या सातवर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना गुरूवारी (ता.7) दुपारी आमोदे (ता. शिरपूर) शिवारात घडली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी गुन्हा नोंदवत संशयित बादल दामू भिल (वय 36, रा. आमोदे) यास अटक केली. 

पीडित मुलीचे कुटुंब नेवाली (ता. सेंधवा, मध्यप्रदेश) येथील रहिवासी असून मोलमजुरीसाठी आले आहे. शिरपूर फाटा येथील चेतन हॉटेलमागे झोपडी बांधून ते वास्तव्यास आहेत. गुरूवारी दुपारी मुलीचे वडील किरण दलाल यांच्या शेतात वखरणी करत होते. तर आई गवत कापत होती. मुलगी खेळता खेळता शेजारील उसाच्या शेतात गेली. दुपारी साडेतीनच्या सुमारास तिचा ओरडण्याचा आवाज ऐकून दोघांनीही धाव घेतली. त्यावेळी संशयित बादल भिल अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार करत असल्याचे आढळून आले. यावेळी मुलीच्या वडिलांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र हाताला हिसका देऊन तो फरार झाला. पिडित मुलीस उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत रात्री उशिरा फिर्याद दिल्यानंतर डीवायएसपी संदीप गावित व पथकाने चक्रे फिरवीत संशयिताला अटक केली. दरम्यान संशयिताला कठोर शिक्षा व्हावी; यादृष्टीने प्रशासनाने कार्यवाही करावी अशा मागणीचे निवेदन आज अखिल महाराष्ट्र आदिवासी जनजागृती संघटनेतर्फे प्रांताधिकारी व डीवायएसपी यांना देण्यात आले. 

Web Title: marathi news jalgaon girl atyachar