बुरशीयुक्‍त शेवया : दोन दिवसात दाखल करणार गुन्हा!

बुरशीयुक्‍त शेवया : दोन दिवसात दाखल करणार गुन्हा!

जळगाव ः शालेय पोषण आहारानंतर अंगणवाडीमधील बालकांना देण्यात येणारा पोषण आहारातील शेवया बुरशीयुक्‍त असल्याचे आढळून आले होते. पंचनामा होऊन देखील पुढील कोणीतीही कारवाई प्रशासनाकडून झाली नाही. यावर सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला कोंडीत पकडले. शिवाय, या प्रकरणात पुरवठा बंद करून गुन्हा दाखल करण्याची मागणी रेटून धरली. यावरून पंचनाम्याच्या आधारावर दोन दिवसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांनी दिले. 
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सभापती पोपट भोळे, प्रभाकर सोनवणे, दिलीप पाटील, रजनी चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अकलाळे उपस्थित होते. लघुसिंचन, बुरशीयुक्‍त शेवयांच्या मुद्यांसह विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदीत पालकांची होणारी लूट व या रक्‍कमेवर जीसटी बिल न दिल्याने शासनाची कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचा मुद्दा रवींद्र पाटील यांनी मांडला. 
 
पुरवठा बंदचा प्रस्ताव पाठविणार 
पाचोरा तालुक्‍यात अंगणवाडीमध्ये पुरवठा झालेल्या आहारातील शेवयांना बुरशी लागल्याचे आढळून आल्या. अडीच महिन्यांपूर्वी स्थायी समिती सभेत सदर मुद्दा उपस्थित होऊन देखील अहवाल अद्याप मिळाला नसल्याचे रावसाहेब पाटील यांनी उपस्थित केला. यावर उपाध्यक्ष महाजन यांनी महिला व बालविकास अधिकारी रफिक तडवी यांना धारेवर घेत मुलांच्या जिवाशी खेळ सुरू असताना प्रकरण मॅनेज करून दाबण्याचा प्रकार सुरू असल्याचे सांगितले. स्थायी सभेत गुन्हा दाखल करण्याचा ठराव झाला असताना अजून का नाही? असा सवाल उपस्थित करत माल थांबविण्याचा ठराव सभागृहाने करण्याचा मुद्दा उपाध्यक्षांनी मांडला. परंतु, ठराव करून देखील सभागृहातील शब्द अधिकारी पाळत नसल्याचे सांगत रावसाहेब पाटील यांनी तडवी यांच्यावर कारवाईची मागणी केली. यावर सीईओंनी सदर प्रकरणात दोन दिवसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश तडवी यांना दिले. तसेच माल थांबविण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्‍ताकडे पाठविण्याचे आदेश उपाध्यक्ष महाजन यांनी दिले. 
 
बोलले नाही ते इतिवृत्तात 
मागील सभेत सदस्य नानाभाऊ महाजन यांनी विकास कामांच्या उद्‌घाटनला त्या भागातील सदस्यांना आमंत्रित करण्याचा मुद्दा मांडला होता. शिवाय कामे पुर्ण झाल्यानंतर सदस्यांचे प्रमाणपत्राशिवाय ठेकेदाराला बिल अदा करू नये असे ठरविण्यात आले होते. मात्र, सभेचे सचिव यांनी असा ठराव घेता येणार नसल्याचे मत नोंदविल्याचा उल्लेख इतिवृत्तात आहे. यावर नाना महाजन यांनी सभागृहात अधिकारी खोट बोलतात. सचिव जे बोललेच नाही, त्याचा उल्लेख इतिवृत्तात कसा झाला. म्हणजे सदस्यांनी मांडलेल्या मुद्यांमध्ये खोटी माहिती भरविली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यावर गेल्या सभेतील सचिव असलेले बी. ए. बोटे यांनी ते चुकीन झाले असल्याचे सांगत सभागृहात दिलगिरी व्यक्‍त केली. यात त्यांची चुकी नसून सचिवांवर दबाव आणून करण्यास भाग पाडण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले. तसेच हा विषय सभागृहापुढे मांडू नये यासाठी फोन आल्याचे देखील नाना महाजन यांनी सांगितले. 
 
सीईओंना हॅण्डपंप भेट 
जिल्ह्यात बोअरवेलची 567 कामे झाले असून, त्यापैकी साडेचारशे ठिकाणी पाणी लागले आहे. परंतु, अद्यापपर्यंत त्यावर हॅण्डपंप बसविण्यात आले नसल्याचे नाना महाजन यांनी उपस्थित केले. यावरून शिवसेनेचे रावसाहेब पाटील, प्रताप पाटील, राष्ट्रवादीचे रवींद्र पाटील, शशिकांत साळुंके यांनी प्रतिकात्मक हॅण्डपंप सीईओ दिवेकर यांना भेट दिला. 

अंथरूणातील विंचू... 
सदस्या पल्लवी सावकारे यांनी ग्रामसेवकाने अनामत रक्‍कम आपल्या वैयक्‍तिक खात्यात जमा केल्यावर प्रत्येकाच्या अंथरुणात विंचू असतात, असे सीईओ दिवेकर यांच्याकडून मिळालेल्या उत्तराचा मुद्दा उपस्थित करत ग्रामसेवकांनी भ्रष्ट्राचार केला तरी पाठीशी घातले जात असल्याचे श्रीमती सावकारे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे अंथरूण झटका मोठे विंचू निघतील, असे सांगून चौकशीची मागणी केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com