दीप विझल्यानंतरही दीपाने लावला ज्ञानदीप

dipa patil
dipa patil

कापडणे : दहावीचे पेपर सुरु झालेत. अन पाचवीतील एकुलता एक भाऊ पवन अाजारी पडला. धुळे शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तब्बेत अती बिगडली. इतिहासाच्या पेपर असलेल्या दिवशी सकाळी अंत्ययात्रा झाली. दीपाने स्वतःला सावरले. पेपर दिला. त्यानंतरचेही पेपर दिलेत. आज दीपा अडुसष्ट टक्के गुण विळवित विशेष प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे. कुटुंबातील एकुलता एक दीप विझल्यानंतरही दीपाने जिद्दीने ज्ञानदीप लावून घर प्रकाशमय केले आहे. तिच्या जिद्दीचे कौतुक होत आहे.

पवन हरपला 
धनूर (ता.धुळे) येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात दहावीतील दीपा जगदीश पाटील आणि पाचवीतील पवन हे दोघे बरोबरीने शाळेत जात. एका छताखाली बसून दीपा पवनचा अभ्यास करुन घ्यायची. दहावीच्या पहिला पेपर मराठीचा असतांनाच आजार पडला. शहारातील खासगी रुग्णालयात दाखल केले. पण तब्बेस सावरलीच नाही. अन वीस मार्चला पवनची जिवनज्योत विझली. 
    
दीपाची दुःखातही जिद्द टिकून
वडिलांचा मृत्यू आठवत नाही. मेहनतीने जगणार्‍या कुटुंबातील कुलदीपकही हरपला. आई सरलाबाईसह दीपासाठी मोठा आघात होता. आजारपणाच्या कालावधीतही भावाची देखभाल करीत अभ्यास सुरू ठेवला होता. वाचन करतांना पुस्तकातही दीपाला पवनचाच चेहरा दिसायचा. इतिहासच्या पेपरच्या एक तास आधी पवनची अंत्ययात्रा झाली. त्यांनतर दीपाने स्वतःला सावरत पेपर दिला. बावीस मार्चला भूगोलचा पेपर दिला. जिद्दीने तिला यशही मिळाले आहे.

प्रेरणादायी यश
वडिलांचे छत्र हरपलेले. दोन बिघे शेती. शेतमजूरी करुन आईला भावाचे शिक्षण पुर्ण करून मोठे करायचे होते. दीपाही आईला साथ देत होती. भाउ हरपला. सर्वस्व हरपल्यानंतरही दीपाचे यश हे दुःख कुरवाळत बसणार्‍यांना प्रेरणादायीच आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com