खडसे बदनामी प्रकरणी अंजली दमानिया न्यायालयात हजर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

रावेर ः माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर विविध आरोप करुन बदनामी करणाऱ्या मुंबई येथील समाजसेविका अंजली दमानिया आज रावेर येथील न्यायालयात हजर झाल्या. त्यांना न्यायालयाने पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीपत्रावर जामिनावर मुक्तता केली. तसेच अजामीनपात्र पकड वॉरंट रद्द करण्यासाठी तीनशे रुपयांचा दंडही ठोठावला. 

माजी मंत्री खडसे यांच्या जावयाची लिमोझिन कार, भोसरी भूखंड प्रकरण, अपसंपदा गोळा करणे, कार्यकर्त्यांचे लाच प्रकरण यासारख्या विषयांवर अंजली दमानिया यांनी खडसे यांच्यावर जळगावी येऊन आरोप केले होते. याप्रकरणात भारतीय जनता पक्षाचे रावेर तालुका अध्यक्ष सुनील पाटील यांनी खडसे यांची बदनामी केल्याबद्दल येथील न्यायालयात खटला दाखल केला होता. याप्रकरणी 8 फेब्रुवारी, 14 मार्च आणि 13 एप्रिलला झालेल्या सुनावणीला श्रीमती दमानिया या उपस्थित राहिल्या नव्हत्या. त्यामुळे न्यायालयाने त्यांना अजामीनपात्र पकड वॉरंट बजावले होते. परंतू, आज दुपारी एकच्या सुमारास दमानिया या न्यायालयात हजर झाल्या. वकिलांची मदत न घेता त्यांनी स्वतःच युक्तिवाद केला. खडसे यांचे वकील सी. जे. पाटील आणि तुषार माळी यांनी युक्तिवाद करतांना त्यांना हमीपत्रावर जामीन देऊ नये, अशी विनंती केली. न्यायाधीश डी. जी. मालवीय यांनी दोन्ही बाजू ऐकून घेत दमानिया यांची पंधरा हजार रूपयांच्या वैयक्‍तिक हमीपत्रावर सुटका करण्याचा निर्णय दिला. 

Web Title: marathi news jalgaon khadse badnami damaniya