हॉकर्सच्या जप्त साहित्याची परस्पर विक्री 

हॉकर्सच्या जप्त साहित्याची परस्पर विक्री 

जळगाव ः शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहिमेंतर्गत महापालिका प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाने हॉकर्सचे लाखो रुपयांचे साहित्य जप्त केले. परंतु या साहित्याची महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून परस्पर विक्री होत असल्याचा खळबळजनक आरोप हॉकर्स संघटनेने उपमहापौर डॉ. आश्विन सोनवणे यांची भेट घेऊन केला. यावेळी उपमहापौरांनी याप्रकरणी चौकशी करण्याच्या सूचना प्रशासनाला देऊ, असे अश्वासन हॉकर्सच्या शिष्टमंडळाला दिले. 
हॉकर्स संघर्ष समितीकडून उपमहापौर डॉ. सोनवणे यांची भेट घेऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी हॉकर्स संघटनेचे होनाजी चव्हाण यांनी गेल्या पाच महिन्यांपासून हॉकर्स बांधवांचे जप्त केलेले साहित्य बालगंधर्व खुल्या नाट्यगृहात ठेवले आहे. जप्त साहित्य पुन्हा हॉकर्स बांधवांना परत मिळावे याबाबत मनपा प्रशासनाला मागणी केली. मागणी करून ही हे जप्त साहित्य परस्पर विक्री केल्या असून काही अनधिकृत हॉकर्सचे साहित्य सोडून दिले जाते. रस्त्यावर नोंदणी नसलेल्या व्यवसाय करणाऱ्या हॉकर्सला मनपा प्रशासनाकडून पाठीशी घातले जाते असे आरोप हॉकर्सने केला. याबाबतही चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन डॉ.सोनवणे यांनी दिले. तर हॉकर्सला वाहतुकीला अडथळा ठरणार नाही या ठिकाणी नियमात राहून बसावे अश्‍या सुचना उपमहापौरांनी यावेळी हॉकर्सला दिल्या. 

कोरी पावती दिल्या जातात 
दैनंदिन बाजार शुल्कासाठी जी पावती हॉकर्सला दिली जाते ती अनेकवेळा नाव न टाकता कोऱ्या दिल्या जातात. त्यातून मोठ्या प्रमाणात अतिकमण कर्मचाऱ्यांकडून गैरव्यवहार होतो असा आरोप केला. यावेळी पावत्यांवर हॉकर्सचे नाव टाकण्याचा सूचना उपमहापौरांनी अतिक्रमण विभागाला दिल्या तर. 

महापौर आयुक्तांशी चर्चा करणार 
हॉकर्सने केलेले आरोपांबाबत उपमहापौर मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्याशी चर्चा करणार आहे. या प्रकाराची चौकशी करून दोषी आढळून आलेल्यांवर कारवाई केली जाईल. असे माहिती उपमहापौर दिली. 

महापौरांची घेतली भेट 
महापौर सिमा भोळे व आमदार सुरेश भोळे यांची हॉकर्स संघर्ष समीतीच्या सदस्यांनी भेट घेतली. यावेळी महापौर व आमदारांना पुश्‍पगुच्छ देवून अभिनंद केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com