मविप्र'साठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; प्रशासना विरोधात घोषणाबाजी 

live photo
live photo

जळगाव ; लबाड, लांडग्यांची घुसखोरी थांबवा, नही चलेगी, नही चलेगी, तानाशाही नही चलेगी, पोलीस प्रशासनाचा धिक्कार असो, मविप्र वाचवा, समाज वाचवा अशी घोषणाबाजी करीत सोमवारी हजारो मराठा बांधव, मविप्र संस्थेचे सभासद रस्त्यावर उतरले होते. जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेतील शासनाच्या बेकायदेशीर हस्तक्षेपाचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता.
 मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या निवडणुकीत मध्ये नरेंद्र पाटील यांच्या संचालक मंडळाचा विजय झाला होता. दरम्यान, शिक्षण मंत्री ना.विनोद तावडे यांच्या सहीने असलेल्या पत्रावर भोईटे यांचे संचालक मंडळ निवडून आल्याचा उल्लेख आहे. गेल्या काही दिवसांपासून याच पत्राच्या आधारे पोलिसांनी निवडून आलेल्या संचालकांना जाब विचारला. शेड्युल वर आजपर्यंत कोणाचीही नोंद नाही. कारण, या संस्थेची नोंदणी सहकार कायद्यानुसार झालेली आहे, असे संजय पवार यांनी सांगितले. 
सकाळी वाजता शिवतीर्थ मैदानापासून शासनाच्या निषेधार्थ मोर्चाला सुरुवात झाली. स्टेडियम, नवीन बसस्थानक, स्वातंत्र्य चौकमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्यासपीठावर मविप्रचे संचालक संजय पवार, हेमंतकुमार साळुंखे, प्रतिभा शिंदे, सचिन सोमवंशी, शिवराम पाटील, भिमराव मराठे यांच्यासह इतरांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चेकऱ्यांनी दोन निवेदन दिली. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यासाठी एक तर दुसरे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत येत असलेले प्रस्ताव रद्द करणे, खोटे गुन्हे मागे घेणे यासाठी देण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com