मिशन फिफ्टी प्लस'वर भाजप ठाम 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

जळगाव : महापालिका निवडणुकीत "मिशन फिफ्टी प्लस'वर भारतीय जनता पक्ष ठाम आहे. महापौर पक्षाचाच होणार आहे. आमची ही अट कायम आहे. त्यामुळे शिवसेनेशी युती होण्याची शक्‍यता कमीच आहे. मात्र यावरही पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. नेतृत्व करण्याबाबतही पक्षाचा कोणताही आदेश नाही, असे स्पष्ट मत भाजपचे महानगरध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

आमदार भोळे म्हणाले, की आम्ही महापालिका निवडणूक स्वतंत्र लढविण्याच्या तयारीत आहोत. "मिशन फिफ्टी प्लस' हे आम्ही अगोदरच जाहीर केलेले आहे. पूर्ण बहुमत मिळवून पक्षाचाच महापौर करायचा हे आमचे ध्येय ठरलेले आहे. त्यामुळे शिवसेनेशी युती होण्याची शक्‍यता कमीच आहे. परंतु पक्षश्रेष्ठीच त्याबाबत निर्णय घेतील. 

नेतृत्वाचा आदेश नाही : खा.पाटील 
महापालिका निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करण्याबाबत आम्हाला कोणताही आदेश आलेला नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसपंदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार ए. टी. पाटील हे आमचे नेते आहेतच त्यांच्या नेतृत्वात आम्ही कार्य करीत आहोत, त्यामुळे निवडणूकही लढणार आहोत. त्यामुळे नेतृत्वाचा कोणताही प्रश्‍न नाही. तसा आम्हाला आदेशही नाही. 

शिवाजीनगर पुलाच्या निविदा 
शिवाजीनगर पुलाच्या कामाबाबत बोलताना खासदार ए. टी. पाटील म्हणाले, की शिवाजी नगर पुलाचा नकाशा बदलण्यात आला आहे. ममुराबादकडील भागाकडेही त्यांचा एक मार्ग काढण्यात आला आहे. त्यालाही मंजुरी मिळाली आहे. पुलाची निविदा प्रक्रिया लवकरच करण्यात येईल. या शिवाय पिंप्राळा उड्डाण पुलाचे कामही करण्यात येईल. राज्यात 168 पूल उभारण्यात येत आहे. त्याच अंतर्गत त्याचेही काम सुरू करण्यात येईल.

Web Title: marathi news jalgaon mission bjp