मित्रापाठोपाठ मित्र निघाला वैकुंठाच्या प्रवासावर.

मित्रापाठोपाठ मित्र निघाला वैकुंठाच्या प्रवासावर.

मित्रापाठोपाठ मित्र निघाला वैकुंठाच्या प्रवासावर..! 

जळगावः अकोला येथे वास्तव्यास असलेल्या मित्राचा मृत्यू झाल्याने त्याच्या अंत्यदर्शनासाठी गेलेल्या दोघा मित्रांच्या कुटुंबावर आज काळाने घाला घातला. द्वारावरुन परतताना वडनेर गावाजवळ वेगवान कार पुलावरून खाली कोसळली. या अपघातात वाल्मीकनगरातील कोळी दांपत्याचा तर गांधीनगरातील रहिवासी नाले कुटुंबातील महिलेचा मृत्यू ओढवला. निवृत्तीनंतरचे मनसोक्‍त राखीव आयुष्य जगणाऱ्या नाले व कोळी कुटुंबीयांवर अचानक कोसळलेल्या या संकटामुळे नातलगांनी एकच आक्रोश केला. 

शहरातील वाल्मीकनगरातील रहिवासी अर्जुन तेजमल कोळी (वय 65) व गांधीनगरातील रहिवासी वसंत दामोदर नाले (वय 65) हे दोघे सुमारे चाळीस वर्षे जुने मित्र. या दोघांच्या मित्राचा अकोल्यात मृत्यू झाल्याने दोन्ही मित्र सपत्नीक तिसऱ्या मित्राकडे शनिवारी सकाळी जळगावहून कोळी यांच्या इंडिका कारने (एमएच 19, बीजे 5614) अकोला येथे गेले होते. तेथून परतत असताना हा भीषण अपघात घडला.

निवृत्तीनंतरचे जीवन 
अर्जुन तेजमल कोळी हे पोलिस वेल्फेअर दवाखान्यात फार्मासिस्ट म्हणून दोन वर्षापूर्वीच सेवानिवृत्त झाले होते. ते शहरातील कोळीपेठेत भाऊ किशोर व राजेंद्र यांच्यासोबत एकत्र कुटुंबात राहतात. अर्जुन कोळी यांना एक मुलगा व एक मुलगी असून दोघांचे विवाह झालेले आहेत. वसंत दामोदर नाले शहरातील गांधीनगर नटराज सिनेमा समोरील गल्लीत कुटुंबासह वास्तव्याला आहे. नाले व कोळी दोन्ही मित्रांची घट्ट मैत्री व विचार एकसारखेच.. दोघेही दांपत्य निवृत्तीनंतरचे आयुष्य मजेत जगता यावे, या विचारांचे... पण, त्यांचे हे विचार अपूर्णच राहिले. 

 
अंत्यदर्शन ठरले अंतिम 
वर्षभरापूर्वीच अर्जुन कोळी यांनी इंडिका कार घेतल्याने दोन्ही दाम्पत्याने सोबत अनेक देवस्थळांना भेटी देत दर्शनही घेतले होते. या दोघा दांपत्यांत घरोब्याचे संबंध तर होतेच यांचे तिसरे मित्र अकोला येथे वास्तव्यास असल्याने त्याचा मृत्यू झाल्याने दोघेही मित्र सपत्नीक त्यांच्याकडे गेले होते. मित्राच्या कुटुंबाप्रती शोकसंवेदना व्यक्त करून परतत असताना कोळी-नाले कुटुंबीयांवर काळाने घाला घातला. कोळी दांपत्य प्राणाला मुकले, तर नाले दांपत्यातील अलका यांचा मृत्यू झाला, व वसंत मृत्यूशी झुंज देत आहेत... या दुर्दैवी घटनेने कोळीपेठ व नाले यांचा रहिवास असलेला जिल्हापेठ परिसर हळहळून गेला. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com