मुक्ताईनगर नगरपंचायतीसाठी 65 टक्के मतदान 

मुक्ताईनगर नगरपंचायतीसाठी 65 टक्के मतदान 

मुक्ताईनगर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी आज 65.47 टक्के मतदान झाले.मतदान शांततेत पार पडले.या निवडणुकीसाठी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजपविरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी आणि कॉंग्रेसमध्ये तिरंगी लढत झाली तर, 17 नगरसेवकपदासाठी अत्यंत चुरशीचे सामने झाले आहेत. त्यामुळे पाच दिवसांनी (ता. 20) होणाऱ्या मतमोजणीकडे लक्ष लागले आहे. 
एकनाथ खडसे हे सकाळपासून आपल्या फॉर्महाऊसमधून निवडणूक हालचालींवर लक्ष ठेऊन होते. भाजपचा नगराध्यक्ष आणि सर्व जागांवर विजय निश्‍चित असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. जळगावला गेलो नसल्याने महानगरपालिका निवडणुकीबाबत आपल्याला काही माहित नाही असेही ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com