चाळीसगाव: आयशरची उभ्या ट्रकला धडक

accident
accident

मेहुणबारे ता.चाळीसगाव : चाळीसगाव-धुळे राज्य महामार्गावर आज सकाळी सात वाजेच्या सुमारास खडकी फाट्यावर उभ्या ट्रकला भरधाव वेगात येणारी आयशरने धडक दिल्याने आयशरचा चालक गंभीर जखमी झाला आहे.

चाळीसगाव - धुळे महामार्गवर खडकी फाट्यावर पंक्चर झालेला ट्रक क्रमांक MH.18 A.A.9591 हा उभा होता.धुळ्याकडुन चाळीसगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या आयश क्रमांक H.R.39 D 6282 ने धडक दिली. दिलेली धडक ऐवढी भीषण होती की गाडीच्या तोंडाचा पुढचा भाग पुर्ण गोळा झाला आहे. यात चालक गंभीर झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

वाहतुक सुरळीत वाहतुक शाखेची साहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली नंदकिशोर निकुभ, दिपक जगताप, आकाश भोसले, बापु पाटील, भास्कर भोसले, राजेंद्र सोनवणे हे  या ठिकाणी विस्कळीत झालेली वाहतुक सुरळीत करत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com