पाच सोसायट्यांच्या सभासदांना कर्जमाफीचा लाभ 

jalgaon
jalgaon

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : तालुक्यात पाच सोसायट्या कर्जमाफीपासुन वंचित या संदर्भात 'सकाळ' मध्ये वृत्त झळकताच सहकार विभागात एकच खळबळ उडाली होती. या वृत्ताची दखल घेत, आज सुट्टी असतानाही कर्जमाफीच्या यांद्याची तपासणी करण्यात आली. त्यामुळे या पाचही सोसायट्याच्यां वंचित शेतकरी सभासदांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे शेतकर्यानी 'सकाळला' धन्यवाद दिले आहेत.

चाळीसगाव तालुक्यातील एकुण 81 विकास सोसायट्या आहेत. यापैकी उंबरखेडे शिवाजी ग्रुप सोसायटीसह तळोंदा- दीगर, देवळी, रोहिणी व हातले या पाच गावातील शेतकरी सभासद कर्जमाफीपासून वंचित होते.या पाचही सोसायट्यांच्या सचिवांनी कर्जमाफीची माहिती शासनाला सादर केली होती. तरी देखील एकाही शेतकऱ्याला आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा लाभ मिळालेला नव्हता. हे वास्तव 'सकाळ' ने दि.6 फ्रेब्रुवारीच्या जळगाव टुडेच्या पान एकवर मांडले सोसायट्या सहकार विभागाने दखल घेतली. पाचही गावाच्या कर्जमाफीच्या याद्या तपासणीला गती दिली. त्यापैकी उबरखेडे येथील दहा ते बारा नावे व  हातले सोसायटीचे तीन नावे आली आहेत. बाकी राहिलेली सभासदाची नावे लवकरच येतील, असे सहकार विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

सुट्टीच्या दिवशी तपासणी
रविवार हा हक्काचा सुट्टीचा दिवस असतानाही चाळीसगाव  जिल्हा बँकेच्या शाखेत उपनिबंधक कार्यालयाचे सहकार अधिकारी एस. व्ही. महाजन, जिल्हा बँकेचे उपविभागीय व्यवस्थापक दिलीप पवार, बँकींग अधिकारी एस. टी. वाणी, भैय्यासाहेब साळुंखे, आर. एस. जाधव यांच्यासह सचिव अरूण राजपुत, नारायण महालेसह ईतर सचिवांनी दिवसभर यांद्याची तपासणी केली.

'सकाळ' कौतुक
शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी सन्मान योजनेत तालुक्यातील पाच गावे वंचित राहीली होती.या  गावातील शेतकरी सभासदाकडुन आवाज उठविला जात नव्हता. सचिवांचाही पाठपुरावा सुरू होता. त्यांना शेतकर्यांना उत्तर देणे कठीण झाले होते.अखेर 'सकाळ' ने कर्जमाफी संदर्भात वस्तुनिष्ठ  परिस्थिती मांडल्यामुळेच सहकार विभागाने दखल घेत पाचही गावाची कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्याची यादी तयार करण्यात गती आली आहे.त्यामुळे सचिवांसह शेतकर्याकडुन सकाळ चे कौतुक होत आहे.

या पाचही गावामधील सभासदाच्या कर्जमाफीच्या याद्या आल्या आहेत.यातील काही राहीले असतील आशी नावदेखील  लवकरच येतील. आज आलेल्या यांद्यांचे बँकेत तात्काळ व्यवहार करण्याच्या सुचना दिल्या आहेत.त्यामुळे राहीलेल्या शेतकर्यांना लवकरच लाभ मिळेल.
- विवेक जगताप, साहाय्यक निबंधक अधिकारी चाळीसगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com