चालकाच्या प्रसंगावधानाने अनेकांचे प्राण बचावले

Gorakh Baviskar
Gorakh Baviskar

पिलखोड(ता. चाळीसगाव), ता. 5 : येथील कुटूंबीय औरंगाबाद येथे लग्नासाठी जात असताना कन्नड घाटात समोरून लग्नासाठी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचे ब्रेक अचानक फेल झाले. क्रूझर चालकाच्या प्रसंगावधानामुळे क्रूझरमधील आठ व ट्रॅव्हल्समधील 50 जणांचे प्राण बचावले आहे. ही घटना सोमवारी(ता. 5) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.

येथील रहिवासी गोरख बाविस्कर हे कुटुंबियांसह आपल्या क्रूझरमधून औरंगाबाद येथे लग्नासाठी जात होते. कन्नड घाटात चालत असताना समोरून अचानक ट्रॅव्हल्स(एमएच 12 एआर 6125) क्रूझरच्या दिशेने आली. गोरख बाविस्कर यांनी अचानक ब्रेक लावला. ट्रॅव्हल्स चालकाला लाईट देऊनही तो थांबत नव्हता. त्याने गाडीचे ब्रेक फेल झाल्याचे खुणावले. रस्त्याला उतार असल्याने ट्रॅव्हल्स काही करून थांबत नव्हती. अखेर ट्रॅव्हल्स क्रूझरला धडकली. गोरख यांनी क्रूझरला रेस देऊन ट्रॅव्हल्स थांबवण्याचा प्रयत्न केला. सुमारे पाच फूट गाडी घसरत गेली आणि जवळच मोठी दरी होती. 

क्रूझरच्या मागे असलेली मोटारसायकलमुळे गाडी अडकली. परंतु गोरख बाविस्कर यांनी ट्रॅव्हल्स पुढे ढकलण्याचा अतोनात प्रयत्न केला. दोन्ही गाडीतल्या प्रवाशांच्या जीवावर बेतली होती. महिला व लहान मुले अक्षरशः तो प्रसंग पाहून रडत होती. अखेर गोरख त्यांच्या प्रयत्नांना यश आले. ट्रॅव्हल्ससह क्रूझर थांबली आणि दोन्ही गाडीतल्या प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या अपघातामुळे क्रूझरचे नुकसान झाले आहे. कन्नड घाटात ज्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. तेथून वीस फुटांवरच ही घटना झाली आहे.  दरम्यान, दोन्ही गाड्यांमधील प्रवाशांचे प्राण वाचवल्याने गोरख यांचे कौतुक उपस्थितांनी केले. 

ट्रॅव्हल्समध्ये होती 'नववधू'
औरंगाबादहून येणारी ट्रॅव्हल्स ही धुळे जिल्ह्यातल्या फागणे येथे लग्नासाठी जात होती. या गाडीत सुमारे 50 प्रवासी होते. याचबरोबर 'नववधू' देखील याच गाडीत होती. मात्र, चालक गोरख यांच्या प्रयत्नामुळे यांच्या आनंदावर विरजण पडले नाही. ही घटना सुरू असताना ट्रॅव्हल्स चालक फरारी झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com