वीजपुरवठा खंडीत करताच महसुलकडून दहा सबस्टेशनला सिल 

Mahavitran
Mahavitran

जळगाव : वीज थकबाकीदार असलेल्यांकडील वसुली करण्यासाठी "महावितरण' आज जिल्ह्यातील मुक्‍ताईनगर तालुक्‍यातील तहसिल कार्यालयाचा वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई केली. मात्र याच वसुलीचा उलट डाव टाकून तहसिल कार्यालयातील महसुल कर्मचाऱ्यांनी महावितरणकडे असलेला थकित करापोटी तालुक्‍यातील दहा सबस्टेशनला सिल लावण्याचे काम केले. यामुळे तालुक्‍यातील जनताच एक प्रकारे वेठीस धरली जात आहे. 

वीज ग्राहकांकडील थकित बिलांची रक्‍कम वसुली करण्यासाठी "महावितरण'कडून वसुली मोहिम सुरू आहे. यात मोठ्या थकबाकीदारांची जसे पाणी योजना, शासकिय कार्यालयांकडील मोठी वसुलीसाठी वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. गेल्या आठवड्यापासून सदर कारवाई जोरात सुरू झाली आहे. त्यानुसार आज मुक्‍ताईनगर तालुक्‍याच्या तहसिल कार्यालयाकडे असलेल्या थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई केली. यामुळे तहसिल कार्यालयात अंधार असून, तेथील संपुर्ण कामकाज देखील बंद पडले होते. 

वसुली- वसुलीचा प्रश्‍न 
महावितरणकडून तहसिल कार्यालयाची वीज खंडीत करण्याची कारवाई केल्यानंतर त्यास उलट उत्तर म्हणून महावितरणकडे 98 हजार रूपये इतका थकित असलेला अकृषक कराचा भरणा करण्याचा आग्रह तहसिल कार्यालयाकडून करण्यात आला. या कारणावरून महसुलच्या कर्मचाऱ्यांकडून मुक्‍ताईनगरसह तालुक्‍यातील दहा सबस्टेशनला सिल लावण्यात आले. यामुळे 82 गावांचा विज पुरवठा खंडीत झाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com