गिरणातून सिंचनासाठीचे पहिले आवर्तन सोडले!

Girna Dam
Girna Dam

पिलखोड (ता. चाळीसगाव) : गिरणा धरणातून सिंचनासाठीचे पहिले आवर्तन शुक्रवारी (ता. 8) सायंकाळी पाचला सोडण्यात आले. या आवर्तनाचा शेतकऱ्यांना रब्बीसाठी फायदा होणार आहे.

सिंचनासाठी ठरलेल्या दोन आवर्तनांपैकी पहिले आवर्तन शुक्रवारी(ता. 8) सायंकाळी पाचला सोडण्यात आले. पहिल्या व सहाव्या क्रमांकाचे दरवाजे उचलुन पाणी सोडले आहे. दोन हजार क्युसेक एवढे आवर्तन आहे. हे आवर्तन सुमारे 3 हजार 100 दशलक्ष घनफुट असून महिनाभर सुरु राहणार आहे. 

आवर्तनाचा रब्बी हंगामाला विशेष फायदा होणार असून चांगल्या उत्पादनाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. गेल्या वर्षी गिरणा साडे नव्वद टक्के भरले होते. त्यामुळे त्यावेळी तीन आवर्तने सिंचनासाठी मिळाली होती. 

यंदा रब्बीसाठीचे पहिले आवर्तन 5 डिसेंबरला सुटणार होते. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे दोन दिवसांचा उशीर झाला. गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. जे. माने यांच्या मार्गदर्शनानुसार आवर्तन सोडण्यात आले. यावेळी गिरणा धरणावर उपभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे, शाखा अभियंता एस. आर. पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. 

दरम्यान, कालव्याच्या पाण्यासंदर्भात अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ झाली असून 20 डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज करावेत, असे आवाहन पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे.

बिबट्याची दहशत....
सध्या गिरणा परिसरात नरभक्षक बिबट्याची दहशत आहे. त्यात नदीला आवर्तन सोडण्यात आले. आधीच गिरणा पाटबंधारे विभागाकडे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यात रात्रीच्या सुमारास पाहणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये बिबट्यामुळे घबराट पसरली आहे. पाटबंधारे विभागाकडून वन विभागाला त्यासंदर्भात पत्र देखील पाठविण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com