बिबट्याने केले वनविभागाला हैराण

leopard
leopard

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : वरखेडे (ता.चाळीसगाव) परिसरात  नरभक्षक बिबट्या सापडत नसल्याने वनविभाग हैराण झाला आहे.या भागात सुमारे अकरा हजार एकर जंगल  असुन, या भागातच बिबट्याचा संचार असल्याचे नुकतीच दरेगाव येथील मुलावर झालेल्या हाल्याच्या घटनेवरून दिसत आहे.

दरेगाव येथील दादा नाईक हा मुलगा आपल्या वडिलांसोबत देवदरा भागात गुरे चारत असताना त्याच्यावर हल्ला  झाला होता.तेथुनच जवळच जंगलाची हद्द सुरू होते. त्यामुळे हा हल्ला जंगलालगत झाल्याने बिबट्याचा वावर हा जंगलात असल्याचे दिसुन येते आहे. 

अकरा हजार एकराचे जंगल 
वरखेडे, तामसवाडी,उपखेड ही तिन्ही गावे मिळुन जवळपास  अकरा हजार एकर जंगलाचे क्षेत्र आहे.त्यामुळे याच जंगलावर आता वनविभागाने लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.मात्र आजपर्यंत एकही अधिकारी कीवा वन विभागाच्या कर्मचार्यांनी जंगलातील या  भागात पायपीट करून शोध घेतला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणने आहे.वरखेडे परिसरात झालेले सर्व हल्ले हे जगंलापासुन दोन ते तीन  किलोमीटरच्या अंतरावर झालेले आहेत.त्यामुळे वनविभागाने स्थानिक  ग्रामस्थांची मदत घेवुन जंगलाचा  भाग पिंजून काढावा आशी अपेक्षा ग्रामस्थानमधुन व्यक्त होत आहे.

दिल्ली व हैद्राबादचे तज्ञ दाखल 
बिबट्याला जेरबंद करणे कीवा ठार मारणे हे आता वन विभागासमोर मोठे आव्हान आहे.यासाठी यापुर्वी आलेले औरंगाबादच्या  डॉक्टर बंधुना यश न आल्यामुळे परत गेले.बारडोलीचे वन्यजीव अभ्यासक जतीन राठोड हे देखील परत गेले.त्यामुळे आता वनविभागाने प्राणी बचाव संघटनेचे सदस्य वसीम जमशेर यांना बोलविले आहे. बिबट्याला शुट करण्यासाठी नबाब नामक शुटर हैद्राबाद येथुन आले आहेत. दिल्ली येथुन आलेले वसीम जमशेर यांना बिबटचा दांडगा अनुभव असल्याने त्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने बोलिविले असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री मोरे यांनी 'सकाळ' ला सांगितले. दरम्यान ज्यांना बिबट्याला पकडण्याचे प्रशिक्षण नाही आशाही काही जणांना या मोहिमेत सहभागी करून घेतले आहे.त्यामुळे नरभक्षक बिबट्या जेरबंद कसा होईल ?असा ही सवाल ग्रामस्थानमधुन उपस्थितीत होत आहे. 

वनविभागाने लावले पिंजरे 
बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजर्यांची व्यूह रचना बदलविल्याची माहीती नाशिकचे भूलतज्ज्ञ सुनिल वाडेकर यांनी दिली.सध्या या भागातील वरखेडे खुर्द गावठाण हद्द, वरखेडे लोंढे बॅरेज जवळ, राजेंद्र  पाटील, मांजरी भागात, दरेगाव, तुकाराम जगताप यांच्या शेतात, भगवान पाटील यांच्या शेतात तिरपोळे शिवारातील भगवानसिंह राजपुत यांच्या शेताजवळ, पिंपळवाड म्हाळसा या सर्व भागात दहा ठीकाणी पिंजरे लावुन शार्प शुटर बसविण्यात आले आहेत.

आज लावण्यात आलेल्या महत्वाच्या चार पिजंर्या जवळ बोकडाची रंगती ( शरीरातील रक्ताचा भाग )टाकण्यात आली आहे.त्यामुळे या ठीकाणी बिबट्या ती  खाण्यासाठी येईल व पिंजर्‍यात अडकले या उद्देशाने पिंजर्यांची रचना करण्यात आली आहे.
- संजय मोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी चाळीसगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com