पोष्टाच्या पासपोर्ट सेवेस प्रारंभ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

जळगाव : भारतीय पोस्ट विभाग व परराष्ट्र मंत्रालय (विदेश सेवा) यांच्या संयुक्त विद्यमाने जळगावात तहसील ऑफिसच्या बाजूला असलेल्या पोस्ट खात्याच्या क्वार्टर मध्ये पोस्टल पासपोर्ट सेवा सुरू करण्यात आली आहे. याचे उद्‌घाटन खासदार ए. टी. (नाना) पाटील यांच्या हस्ते कोनशिला अनावरण व फीत कापून करण्यात आले. 

याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, आमदार सुरेश भोळे, भारतीय विदेश सेवेच्या मुंबई येथील क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी डॉ. स्वाती कुलकर्णी, औरंगाबाद डाक विभागाचे पोस्टमास्तर जनरल श्री. प्रणवकुमार, अतिरिक्त क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी तुलसीदास शर्मा, डाक अधीक्षक बी. व्ही चव्हाण, शिवाजी पाटील आदी. उपस्थित होते. 
खासदार पाटील यावेळी बोलताना म्हणाले, की जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय सुरू व्हावे यासाठी सन 2009 पासून प्रयत्न करीत होतो. परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील शासनाने जनतेसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. या निर्णयांच्या माध्यमातून सर्व भागांचा समान विकास करण्याचे धोरण आखले आणि शासन नागरिकांच्या दारी या उपक्रमांतर्गत जळगाव शहरात उडान योजनेतंर्गत विमानसेवा सुरू करण्यात आली. आता पासपोर्ट सेवा केंद्रही सुरू झाले आहे. जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी मिळावी. यासाठी जिल्ह्यात भूदल व नौदलाची विशेष भरती मोहीम राबविण्यात आली. चाळीसगाव येथे सैन्य भरती केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे  कार्यक्रमास सभापती पोपट भोळे, नगरसेवक उज्ज्वला बेंडाळे, पृथ्वीराज सोनवणे, तहसीलदार अमोल निकम यांच्यासह पासपोर्ट विभाग, डाक विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: marathi news jalgaon post office passport