"आरटीई'तून वंचितांनाही चांगलं शिक्षण मिळेल काय? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

जळगाव : आयुष्यात शिक्षणाला फार महत्त्व आहे. ज्याच्याकडे शिक्षण आहे तोच या आधुनिक युगात टिकू शकेल. मात्र सध्या शिक्षणासाठी लागणारा खर्च वाढला असल्याने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण होऊन बसले आहे. समाजातील 25 टक्के गरजू मुलांना शिक्षण मिळावे यासाठी आतापर्यंत शिक्षणहक्क कायद्यांतर्गत शाळांमध्ये आर्थिक व दुर्बल घटकांतील मुलांनाच प्रवेश देण्यात येत होता. मात्र आता वंचित घटकांमधील इतर संवर्गातील मुलांनाही आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. अर्थात, ही प्रक्रिया शासकीय यंत्रणेने प्रामाणिकपणे राबवली तरच वंचितांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ मिळू शकेल... 
 
शालेय प्राथमिक शिक्षण हा शिक्षणाचा पाया आहे. पाया मजबूत असेल तर आपण कोणतेही काम सहज करू शकतो. त्यामुळे समाजातील गरीब व गरजू मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे व त्यांचे भविष्य उज्वल व्हावे यासाठी "आरटीई'तंर्गत प्रवेश देण्यात येतात. शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी काही महिन्यांपूर्वी अर्ज भरण्यात आले होते. मात्र निम्म्याहून अधिक जागा रिक्त असल्याने या जागांवर वंचित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी शिक्षण विभागाने पुन्हा अर्ज भरण्यास सुरवात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे ज्या विद्यार्थ्यांचा या आधी काही कारणास्तव नंबर लागला नव्हता अथवा काहींच्या ऑनलाइन अर्जात गोंधळ झाला होता अशा विद्यार्थ्यांना दुसरी संधी चालून आली आहे. 

एकीकडे आरटीई प्रक्रियेत प्रथमच दोनदा अर्ज भरण्याची प्रक्रिया होत आहे. त्यातही रिक्त जागांवर विशेषतः: वंचित मुलांना संधी दिल्याने पालकांमध्ये समाधान दिसून येत आहे तर दुसरीकडे मात्र शाळा विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारत असल्याच्या तक्रारी सतत समोर येत आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण विभाग सातत्याने प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे शासनाचे अनुदान घेऊनही शाळा आरटीईतंर्गत प्रवेश घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना नकार देत आहे. यामुळे यंदा अनेक विद्यार्थ्यांना शाळेचा नकारघंटा ऐकायला मिळाला. 
 
कही खुशी... कही गम 
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत गेल्या चार दिवसांपासून पीएच.डी. मार्गदर्शक निश्‍चितीची प्रक्रिया सुरू आहे. पीएच.डी. पात्रतापूर्व परीक्षा झाल्यानंतर तब्बल आठ महिन्यांनंतर ही प्रक्रिया राबविण्यात आली. यात काही विद्यार्थ्यांना मार्गदर्शक मिळाले तर काही विभागांतील मार्गदर्शकांकडे विद्यार्थी संख्या पूर्ण असल्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शक मिळालेले नाहीत. त्यामुळे "कही गम...कही खुशी' अशी परिस्थिती आहे. अर्थात, एकूणच पीएच.डी.धारकांची संख्या प्रचंड वाढणार असल्याने पात्रतेसाठीच्या "पेट'चे निकष अधिक कठोर करायला हवेत, असे बोलले जात आहे. 
 
Web Title: marathi news jalgaon rte education