लग्नात दिला संविधांचा आहेर! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

भडगाव  : लग्नात आहेर म्हणून कोणी भांडे देतात तर कोणी साड्या अगदी रोख पैसेही भेट म्हणून देताना दिसतात. मात्र, वाडे (ता. भडगाव) येथील वाडेकर व शिदांड (ता. पाचोरा) येथील तांबे कुटुंबाने चक्क आहेर म्हणून संविधान भेट दिले. वर- वधू कडील दोघांनी प्रत्येकी 700 संविधानाच्या प्रतींची भेट दिली. या आगळ्यावेगळ्या भेटवस्तूने हा विवाहसोहळा चर्चेचा ठरला आहे. 

लग्न म्हटले की, नातेवाईक, मित्र परिवार, आप्तस्वकीयांना मूळ लावण्याची प्रथा आहे. ज्यांना मूळ लावले जाते त्यांना काही तरी भेटवस्तू दिली जाते. सुरवातीला साड्या दिल्या जायच्या. मात्र, काळानुरूप वेगवेगळ्या प्रकारचे भांडे दिले जाऊ लागले. अगदी अलीकडे तर संबंधितांना आहेर म्हणून रोख पैशाचे पाकीटही दिले जाऊ लागले आहे. मात्र, वाडे (ता. भडगाव) येथील वाडेकर व शिंदाड (ता. पाचोरा) येथील कुटुंबीयांनी लग्नात आहेर म्हणून चक्क संविधान भेट दिले. 
वाडे येथील निवृत्त मुख्याध्यापक सुपडू गंगाराम वाडेकर यांचे लहान पुत्र बोधीराज वाडेकर व शिंदाड येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम तांबे याची कन्या डॉ. प्रियंका तांबे यांचा नुकताच पाचोरा येथे विवाह झाला. वर बोधीराज वाडेकर हे शिक्षक आहेत. वधू डॉक्‍टर आहे. दोघांचे कुटुंब सुशिक्षित आहे. त्यामुळे दोघांनी आहेर म्हणून वस्तू न घेता संविधान देण्याचा एकमताने निर्णय घेतला.

Web Title: marathi news jalgaon sanvidhan