शिवाजीनगर वाढीव उड्डाणपुलास विरोध 

live photo
live photo

जळगाव ः शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल जीर्ण असून, तो नवीन बांधला जात आहे. याचा आनंद शिवाजीनगरवासीयांना आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावरून रस्ता सरळ नागरीवस्तीत पूल उतरवून तो "यु-टर्न' करून ममुराबाद रस्त्याला जोडण्यास विरोध आहे. यामुळे नागरिकांना रहदारीचा त्रास होणार आहे. प्रशासनाने दखल न घेतल्यास न्यायालयात धाव घेऊ, तसेच रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. 
शिवाजीनगरातील रेल्वे उड्डाणपुलाच्या नवीन प्रस्तावित वाढीव पुलाच्या विरोधात आज पत्रकार परिषद झाली. यावेळी आरटीआय कार्यकर्ते दीपक गुप्ता, विलास सांगोरे, जयप्रकाश महाडीक, नरेंद्र महाजन, आसिफ खान आदी उपस्थित होते. गुप्ता म्हणाले, की नव्याने बांधकाम करण्यासाठी 30 सप्टेंबरपासून पूल बंद होणार आहे. पूल बांधण्याला आमचा विरोध नसून, ममुराबाद रस्त्याला जोडण्यासाठी वाढीव पूल हा नागरी वस्तीत उतरविण्याला विरोध आहे. रस्ते अरुंद असून, अवजड वाहनांमुळे या रस्त्यावर प्रचंड त्रास वाढून रहदारी वाढणार आहे. त्यामुळे शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलावर "वाय' आकाराचा पूल उभारून एक दूध फेडरेशनकडे, तर दुसरा रेल्वेमार्गाच्या बाजूने थेट ममुराबाद रस्त्याला सरळ रस्ता जोडावा, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. याबाबत न्यायालयात जाऊन या वाढीव पुलाचे काम थांबवू, तसेच गरज पडल्यास साडेचार हजार नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करू, याला प्रशासन जबाबदार राहणार, असा इशारा यावेळी देण्यात आला. 

तहसील कार्यालयाजवळून मार्ग करा 
पुलाचे काम सुरू झाल्यास जवळपास 18 महिने हा मार्ग बंद राहणार आहे. त्यामुळे शिवाजीनगर येथील नागरिकांना शनिपेठ अथवा दूध फेडरेशन मार्गे अन्य रस्त्यांनी फिरून शहरात यावे लागेल. त्यासाठी पुलावरून वाहतूक सुरू होत नाही तोपर्यंत लहान वाहनांसाठी तहसील कार्यालयाजवळून पर्यायी मार्ग करावा. 

वाढीव पूल, रस्त्याला 20 कोटी खर्च 
सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे प्रशासनाकडून हा रेल्वे उड्डाणपूल 45 कोटीतून बांधला जाणार आहे. त्यात 20 कोटी रुपये खर्च वाढीव पुलावर होणार आहे. परंतु पुलावरून "वाय' किंवा "टी' आकारावरून रेल्वे लाइनच्या बाजूने ममुराबाद रस्त्याला हा पूल जोडायला केवळ पाच कोटी रुपये खर्च होणार आहे. तसेच यु-टर्न'चा एक किलोमीटरचा त्रास, इंधनाची देखील बचत होईल. 
 
विश्‍वासात न घेता निर्णय 
बिल्डरांच्या फायद्यासाठी वाढीव पूल शिवाजीनगरातील नागरी वस्तीत पूल उतरविला जात आहे. परंतु हे बिल्डरांच्या जमिनीचा दर वाढविण्यासाठी व इमारती वाचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पुलाबाबत नागरिकांच्या हरकती मागविण्याची गरज होती. परंतु प्रशासनाने कोणालाच विश्‍वासात न घेता पूल बांधण्याचे ठरवले असून, याला नागरिकांचा विरोध आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com