आरामदायी "शिवशाही' भाड्याला परवडेना! 

residentional photo
residentional photo

जळगाव ः एक काळ असा होता, की राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये पाय ठेवायला जागा मिळत नव्हती. आता प्रवाशांनी खासगी वाहनांचा पर्याय निवडला आहे. महामंडळाने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी सेवाही सुधारली; पण प्रवासी घटले आहेत, ही स्थिती निर्माण झाली आहे. सुरक्षित प्रवास असला, तरी भाड्यात तडजोड होत नसल्याने जळगाव- पुणे मार्गावर धावणाऱ्या शिवशाही स्लिपर कोच बसचे भाडे सध्यातरी परवडणारे नाही. खासगी ट्रॅव्हल्स व रेल्वेच्या तुलनेत अधिक आहे. 

निम्मे बर्थ खाली 
खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांना मिळणारी सेवा तसेच यातून होणाऱ्या आरामदायी प्रवासामुळे प्रवाशांची ट्रॅव्हल्सला पसंती दिली जाते. पण या स्पर्धेत महामंडळ देखील उतरले असून, नवीन शिवशाही स्लिपर कोच सुविधा असलेली बस सुरू केली आहे. जळगाव- पुणे मार्गावर ही बस सुरू झाली असली, तरी गर्दीचा हंगाम संपल्याने हवा तो प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. या 30 बर्थ असलेल्या बसचे निम्मे बर्थ रिकामेच राहत असल्याची स्थिती आहे. भाडे 975 इतके आहे. या तुलनेत रेल्वे एसी थ्री टायरचे भाडे 745 रुपये; तर ट्रॅव्हल्सचे भाडे 800 रुपयांपर्यंत आहे. 

"शिवशाही'चे भाडे परवडेना 
महामंडळाची शिवशाही बस ही खासगी ट्रॅव्हल्सला टक्‍कर देणारी ठरणार आहे. लग्नसराई किंवा दिवाळीच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सचालकांकडून प्रवाशांची लूटमार करत दुप्पट भाड्याची आकारणी केली जाते. जळगाव- पुणेचा विचार केल्यास ट्रॅव्हल्सचे स्लिपर कोच भाडे एक हजार ते 1200 रुपयांपर्यंत जाते. इतर वेळेस सातशे ते आठशे रुपये भाडे आकारणी होते. पण महामंडळाच्या शिवशाही बसचा विचार केल्यास जळगाव- पुणेसाठी 975 इतके भाडे आहे. जे गर्दीच्या हंगामात प्रवाशांना परवडणारे असून, इतर वेळी मात्र महागात पडणारे आहे. हीच परिस्थिती जळगाव- मुंबई प्रवासाची आहे. मुंबईसाठी शिवशाही भाडे एक हजार रुपये आहे. यामुळे सध्यातरी भाड्याच्या दृष्टीने शिवशाही बस न परवडणारी झाली आहे. 
 
जळगाव- पुणे भाडे 
बस.....................भाडे 
शिवशाही स्लिपर.......975 
खासगी ट्रॅव्हल्स........800 ते 850 
रेल्वे एसी थ्री टायर......745 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com